उरुळीकांचनमध्ये गणराज फायटर्स संघ ठरला शाहु फुले आंबेडकर चषक २०२५चा मानकरी, सामना पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींची अलोट गर्दी..

उरुळीकांचन: क्रिकेट वेड्या खेळाडूंनी वय, व्यवसाय , नोकरी बाजूला ठेऊन आयोजित केलेल्या ‘शाहू फुले आंबेडकर चषक ‘-२०२५ या स्पर्धेत गणराज फायटर्स संघाने विकास दौंडकर वारीअर्स संघाचा यशस्वी धावांचा पाठलाग करीत ही स्पर्धा जिंकली आहे.

स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पहिल्या डावात विकास दौंडकर फायटर्स संघाकडून प्रविण गायकवाड यांनी चांगली सुरुवात करून आपल्या संघाला १०० धावांचे टार्गेट देतील अशी अपेक्षा असताना प्रविण गायकवाड हे बाद झाल्यानंतर गणराज फायटर्स च्या प्रज्वल कड यांच्या टेप बॉल ची तुफानी गोलंदाजी पाहून प्रेक्षकांची सामन्यातील रंगत वाढली. त्यानंतर फक्त अमोल थोरात एका बाजूने लढत होता असे दिसत होते . अमोलचे २९ चेंडू ५६ धावा केल्या तर गणराज फायटर्स संघास : ८ ओवर ८४ धावांचे लक्ष ठेवण्यात आले होते .
धावांचा पाठलाग करताना दुसऱ्या डावात गणराज फायटर्स यांच्याकडून सचिन जगताप यांनी सुनिल दिक्षित यांच्या पहिल्या दोन चेंडूवर दोन चौकार मारून संघास चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर विकास दादा दौंडकर वॉरीअर हा संघ निर्धाव चेंडू टाकण्यास प्रभावी ठरला. मात्र सामन्यात सिंगल , डबल अशा धावा करीत निखिल कोतवाल यांनी शांतपणे मोठ्या आत्मविश्वासाने संघास पुढे घेवून जात होते . तेवढयात पृथ्वीराज कांबळेच्या गोलंदाजी वर सचिन कांचन यांना झेल बाद झाला तो झेल सुनिल दिक्षित यांनी थडमॅन मध्ये झेप मारून संघाचे पारडे दोन्ही बाजूने आणले होते.

त्यानंतर विकास दादा दौंडकर संघाची शेवट पर्यंत खराब क्षेत्ररक्षण दिसून आले , एका धावेच्या ठिकाणी दोन धावा दिल्या गेल्या हे असे तीन ते चार वेळा झाले शेवट सामना ६ चेंडू ५ धावांवर आला मग गोलंदाजी संघास एक एक धावांचे महत्व समजू लागले त्यावेळी कळाले की मोठी मॅच चांगल क्रिकेट खेळण्यासाठी जशी बॅटींग आणि बॉलिंग महत्वाची असते तशी फिल्डींग ही महत्वाची असते शेवटच्या षटकात प्रविण गायकवाड यांनी पहिल्या दोन चेंडूत सिंगल डबल धावा येत शेवट पर्यंत झुंज देणारा गणराज फायटर्स संघाचा फलंदाज निखिल कोतवाल यांच्या वैयक्तीक १९ बॉल ४१ धावा करत शेवटी चौकार मारून शाहु फुले आंबेडकर चषक २०२५ चा सामना यशस्वी पाठलाग करीत जिंकला.
गणराज फायटर्स या संघाचे
मालक डॉ .समीर ननावरे यांनी
संघाचे प्रतिनिधित्व केले होते.
शाहु फुले आंबेडकर चषक २०२५ स्पर्धेचे विजयी संघ पुढीलप्रमाणे…
प्रथम क्र : गणराज फायटर्स
द्वितीय क्र : विकास दादा दौंडकर वॉरीअर
तृतिय क्र : जितु भैय्या बडेकर फायटर्स
चतुर्थ क्र : जय भवानी वॉरीअर
सर्वोत्तम कामगिरी करणारे खेळाडू…
मॅन ऑफ द सिरीज : अली अन्सारी
उत्कृष्ठ फलंदाज : प्रविण गायकवाड
उत्कृष्ठ गोलंदाज : बबलू साळुंखे
उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक : निखिल कोतवाल
उत्कृष्ठ टेप बॉल गोलंदाज : प्रज्वल कड