Ganpat Gaikwad Firing : मोठी बातमी! महेश गायकवाड गोळीबार प्रकरणानंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय, आता…


Ganpat Gaikwad Firing : भाजपाचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. राज्य शासनाने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे दिला.

आता आणखी एक महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारने आता पोलिसांना राजकारणी,बिल्डर आणि तथाकथित समाजसेवकांसह जणांच्या बंदुकीचे लायसन्सची पडताळणी करण्याचे आदेश दिले आहे. आतापर्यंत ठाण्यात जवळपास ४ हजार जणांना बंदुकीचे लायसन्स दिले आहे.

यामध्ये अनेक राजकारणी, बिल्डर आणि तथाकथित समाजसेवकांचा समावेश असून यामध्ये राजकारणी बंदुकीचे लायसन्स मिळवण्यात पहिल्या क्रमांकावर आहे. पण आता आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबार प्रकरणामुळे ठाणे पोलीस आता सर्वच लायसन्सची पडताळणी करणार आहेत. Ganpat Gaikwad Firing

महत्वाचे म्हणजे आवश्यकता नसेल त्यांचे लायसन्स रद्द होण्याची शक्यता आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आता कोणालाही बंदूक बाळगता येणार नाही. पडताळणीमध्ये बंदुकीचे लायसन्स का हवे? याचे कारण जाणून घेतले जाईल.

दरम्यान, महेश गायकवाड यांच्या शरीरातून सहा गोळ्या काढण्यात आल्या. त्यानंतर आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. तसेच राहुल पाटील यांना जनरल वार्डात शिफ्ट करण्यात आले. दुसरीकडे आमदार गणपत गायकवाड यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. त्यासाठी डॉक्टरांचे पथक पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!