पुण्यातील Z ब्रीजवर गँगवॉर! उलट्या कोयत्याने मारलं, गाड्या फोडल्या, थरारक राड्याने पुणे हादरलं..


पुणे : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.

पुणे शहरात पुन्हा एकदा गँगवॉर सदृश प्रकार घडून आला आहे. झेड ब्रिजजवळ मंगळवारी रात्री उशिरा काही युवकांनी मिळून एका तरुणावर थेट कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्याचा थरारक व्हिडीओ आता समोर आला आहे.

विशेष म्हणजे, ही संपूर्ण घटना नियोजित पद्धतीने झाली असून, पाठलाग, दबा धरून हल्ला आणि वाहनांची तोडफोड अशा सगळ्या घटना सीसीटीव्हीत कैद झाल्या आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन तरुण मोपेडवरून जाताना दिसत आहेत. त्यांचा काहीजण पाठलाग करत असल्याचं स्पष्ट दिसतं. पाठलाग सुरू असल्याची कल्पना येताच, ते झेड ब्रिजजवळ थांबतात. त्याचवेळी दुचाकींवर आलेल्या पाच ते सहा हल्लेखोरांनी त्यांच्यावर थेट कोयत्याने हल्ला चढवला. या दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र घटनास्थळी दबा धरून बसलेल्या इतर हल्लेखोरांनी त्यांना पुन्हा पकडून मारहाण केली.

हल्लेखोरांनी केवळ तरुणांवरच नव्हे, तर त्यांच्या वाहनावरही कोयत्याने तोडफोड केली. या संपूर्ण घटनेचं दृश्य सीसीटीव्हीत स्पष्टपणे कैद झालं आहे. यामध्ये काहीजण पाठलाग करताना, तर काहीजण आधीच दबा धरून बसल्याचं दिसतं, त्यामुळे हल्ला पूर्णपणे पूर्वनियोजित असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, हल्ल्यामागे जुन्या वादाचं कारण असल्याचं समजतं. पण झेड ब्रिजसारख्या वर्दळीच्या ठिकाणी अशाप्रकारचा हिंसक प्रकार घडल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. मंगळवारी रात्री सुमारे आठच्या सुमारास हा प्रकार घडला असून, हातात कोयते घेऊन रस्त्यावर दहशत माजवणाऱ्या टोळक्याने काही अन्य वाहनांचीही तोडफोड केली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!