गणपती बाप्पा मोरया!! राज्यात गणेशोत्सवाचा जल्लोष, वाद्यांच्या गजरात बाप्पाचं आगमन…

पुणे : गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया म्हणत मानाच्या गणपतीची मिरवणूक विविध शहरात लक्ष वेधून घेत आहे. गणेशोत्सवाचा आज पहिला दिवस आहे. उत्सवमूर्ती आता थाटात त्यांच्या स्थापना ठिकाणी पोहचत आहेत. त्याठिकाणी विधीवत प्राण प्रतिष्ठापन्ना करण्यात येईल.

राज्यात आज घरोघरी आणि विविध मंडळात जल्लोषात गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. ढोल-ताशांच्या नादात आणि पारंपारिक वाद्यांच्या गजरात थाटात बाप्पाचे आगमन ठिकठिकाणी सुरू आहे. मानाच्या गणपतीच्या आगमन सोहळ्याची विवध शहरांमध्ये धूम सुरू आहे. भाविक भक्ती भावात न्हाऊन निघाले आहेत.
आज पासून राज्यभरात पुढील १० दिवस गणेशोत्सव हा सण मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.मुंबई मधील सगळ्या मोठ्या गणपती मंडळामध्ये उत्साहाच वातावरण पाहायला मिळत आहे. लालबाग-परळ परिसर तर गर्दीने फुलून गेला आहे आणि लालबाग च्या राजाच दर्शन घेण्यासाठी पहिल्याच दिवशी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

लालबागच्या राजाच्या मुख दर्शन घेण्यासाठी भली मोठी रांग लागली आहे. राज्यातही अनेक शहरात, गाव खेड्यात गणेशोत्सवाचा आनंद सोहळा सुरू आहे. दीड दिवसांचा, पाच दिवसांचा, दहा दिवसांच्या घरगुती गणपत्तीचे आगमन आज होत आहे.
देशातल्या सर्वात श्रीमंत गणेश बाप्पा म्हणजे जीएसटी सेवा मंडळ च्या ७१ वा वर्ष आहे. प्रत्येक वर्षी प्रमाणे यावर्षी देखील इथे भाविकांची मोठी गर्दी उसळत आहे. सर्वात महत्त्वाचं या बाप्पाच्या वैशिष्ट्य आहे की इथं भाविकांची सुरक्षा आणि त्यांना योग्य पद्धतीने दर्शन व्हावं याची पुरेपूर काळजी घेतली जाते.
मंडळातर्फे यंदा एकूण ४७४ कोटींचा विमा काढण्यात आला आहे. बाप्पाच्या मूर्तीवर जवळपास ६९ किलो सोना आणि ३६५ किलो चांदीने शृंगार करण्यात आला आहे. नवसाला पावणारा विश्वाचा राजा म्हणून या गणपति बाप्पाची ओळख आहे.