पेठ येथील जुगार तब्बल 1 लाख 67 हजारांचा जुगार! उरुळीकांचन पोलिसांनी आवळला बाडबिस्तारा …..

उरुळी कांचन : पेठ (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील दादा आढाव यांच्या शेताजवळील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर उरुळी कांचन पोलिसांनी छापा टाकला आहे. यामध्ये पोलिसांना 1 लाख 67 हजार 100 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर घटनास्थळावरून 6 अनोळखी इसम पसार झाले आहेत.

ही कारवाई रविवारी (ता. 25) मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार सुमित वाघ यांना पेठगाव परिसरातील दादा आढाव यांच्या शेताजवळील पत्र्याच्या शेडमध्ये काही इसम जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. सदर ठिकाणी पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनेच्या ठिकाणी छापा टाकला असता संशयित इसमांनी त्याठिकानावरून पळ काढला.
दरम्यान, घटनास्थळी जुगार खेळण्यासाठी वापरण्यात आलेली रोख रक्कम, 52 पत्ते, एक लाकडी टेबल, एक प्लॅस्टिक टेबल, 6 प्लास्टिक खुर्च्या व चार मोटारसायकली (हिरो स्प्लेंडर, होंडा ॲक्टिवा, हीरो पॅशन) असा एकूण 1 लाख 67 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दरम्यान, याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गु.र.नं. १६१/२०२५ प्रमाणे महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल खोमणे करीत आहेत.
