उद्यापासून पाण्याचा थेंबही….; मनोज जरांगे यांचा सरकारला कडक इशारा ; काय म्हणाले जरांगे?

मुंबई : मुंबईतील आझाद मैदानावर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. राज्यभरातून मराठा आंदोलक मोठ्या प्रमाणावर मैदानात उपस्थित असून जरांगे पाटील यांनी सरकारला कडक इशारा दिला आहे.काल आणि आज मी पाणी प्यायलो. उद्यापासून मी पाणी घेणार नाही. पाणी बंद करणार आहे. सरकार ऐकत नाही. उपोषण कडक करणार असं स्पष्ट त्यांनी सांगितलं.

पुढे बोलताना जरांगे म्हणाले, आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे मी उद्यापासून पाण्याच्या थेंबाला सुद्धा हात लावणार नाहीअसं ते म्हणाले.मराठा तरुणांनी मान खाली घालावी लागेल असं पाऊल उचलायचं नाही. सर्वांनी शांत राहायचं. यांनी कितीही अन्याय अत्याचार करू द्या. मी आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही. हा माझा शब्द आहे. पुढे ते म्हणाले, ‘काल जर मुख्यमंत्र्यांच्या घरी बैठक झाली. तातडीने मार्ग काढा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत असं ऐकलं. मग ज्यांना आदेश दिले तर ते मार्ग का काढत नाही. उपसमितीला आदेश दिला. मग मार्ग का काढत नाही. हे लय भंगार आहेत. नुसत्या बैठका घेत आहेत. लय झाल्या बैठका असे जरांगे म्हणाले.

ते म्हणाले, कुणी रेनकोट, छत्र्या वाटत असतील तर एक रुपया देऊ नका. त्यांच्या छत्र्या, रेनकोट घेऊ नका. काही लोकांनी धंदा सुरू केला आहे. समाजाच्या नावाने कमवत आहेत. माझ्या नावावर कमावत आहेत. रेनकोट वाटपाच्या नावाखाली पैसे गोळे करू नका. शेवटचं सांगतो. महाराष्ट्रातील मराठ्यांनी कुणालाही पैसे द्यायचे नाही अस मनोज जरांगे म्हणाले.

