माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींची प्रकृती खालावली, हिंदुजा रुग्णालयात दाखल; उद्धव ठाकरेंकडून प्रकृतीची विचारपूस


मुंबई : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची तब्येत खालावल्याने त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कालपासून मनोहर जोशी यांना अस्वस्थ वाटत होते. त्यांच्यावर हिंदुजा रुग्णलायात आयसीयु मध्ये उपचार सुरू आहेत. मनोहर जोशी यांची प्रकृती सध्या स्थिर आहे, अशी माहिती समोर आली आहे.

गौतमी पाटीलने महाराष्ट्राचा बिहार करू नये! घनश्याम दराडेचा थेट इशारा..

तसेच त्यांची विचारपूस करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे हिंदूजा रुग्णलयात दाखल झाले आहेत. मनोहर जोशी गेल्या काही काळापासून ते राजकारणात सक्रिय नव्हते.

तुळजापूरनंतर आता रांजणगावच्या महागणपती मंदिर प्रशासनाने घेतला मोठा निर्णय, आता त्या कपड्यांना बंदी..

दरम्यान, मनोहर जोशी यांनी मुंबई महापालिकेचे नगरसेवक, महापौर, विधान परिषदेचे सदस्य, आमदार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य पदही भुषविले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!