तुळजापूरनंतर आता रांजणगावच्या महागणपती मंदिर प्रशासनाने घेतला मोठा निर्णय, आता ‘त्या’ कपड्यांना बंदी..


पुणे : जिल्ह्यातील अष्टविनायक महागणपती रांजणगाव मंदिर प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. अष्टविनायक महागणपती रांजणगाव मंदिरात तोकडे कपडे घातलेले तसेच अंगप्रदर्शन करणारे, असभ्य अशोभनीय वस्त्रधारी, उत्तेजक कपडे घातलेले, हाफ पॅन्ट घातलेले, बर्मुडाधारक यांना आता मंदिरात प्रवेश नाही.

तसेच वन पीस, शॉर्ट स्कर्ट, शॉर्ट पॅन्ट घातलेल्यांनाही मंदिरात प्रवेश मिळणार नाही. भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचे भान राखणाऱ्यांनाच मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे.

दरम्यान, श्री तुळजाभवानी मंदिरात पुजाऱ्यांना ड्रेस कोड शिवाय प्रवेश बंद करण्यात आला आहे. तरी काही पुजारी तुळजाभवानी मंदिर परिसरात जीन्स आणि शर्ट घालून फिरत असल्याचे मंदिर प्रशासनाच्या निदर्शनास आले.

याप्रकरणी तुळजापूर मंदिर प्रशासनाने एक नोटीस काढली आहे. ही नोटीस मंदिर परिसरातील भितींवरती लावण्यात आल्या आहेत. यामध्ये पुजाऱ्यांनी ड्रेस कोड शिवाय मंदिरात प्रवेश करू नये अन्यथा देऊळ कवायत कायदा (निजाम कालीन कायदा) नुसार कारवाई करण्यात येईल, असे सांगितले जात आहे.

मंदिरातील दर्शन मंडपाच्या तिसऱ्या मजल्यावर भाविकांशिवाय पुजाऱ्यांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. यामुळे आता भाविक याला कशा प्रकारे प्रतिसाद देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!