खडकी येथे पत्नीचे अपहरण करून खून करणाऱ्या पतीला पाच दिवसांची पोलीस कोठडी, घटनेमुळे राज्यात खळबळ

दौंड : दौंड तालुक्यातील खडकी येथे पत्नीला मारहाण करून अपहरण करून पत्नीचा खून केलेल्या आरोपीला दौंड पोलीस न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
संतोष अहि-या पवार असे खून करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहिती नुसार , खडकी येथील संतोष पवार याने त्याची पत्नी सुरेखा हीला १९ मे रोजी मारहाण केली . त्यानंतर अपहरण करून नंतर तिचा खून करून मृतदेह लोणारवाडी गावच्या हद्दीत उसाच्या शेतात टाकून दिल्याची घटना उघडकीस आली होती.
ब्रेकिंग! अखेर संसद भवनाचे उद्घाटन कोण करणार याचा निकाल लागला, न्यायालयाने दिला मोठा निकाल
दौंड पोलीस ठाण्यात २० मे रोजी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी अपहरणाची तक्रार दाखल होताच तपासाची सूत्रे हलविली. अवघ्या चार दिवसाच्या आत मृतदेह शोधून काढत अपहरण केल्याच्या गुन्ह्याचा छडा लावला.
पिंपरी- चिंचवडमध्ये पोलिस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या; कारण..
या प्रकरणी आरोपी पती संतोष पवार याला गुरुवारी (ता. २५) दौंड न्यायालयात हजर करण्यात आले. तसेच दौंड न्यायालयाने अधिक तपासासाठी आरोपीला ५ दिवस पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहे .