आधी अहिल्यानगरचा पत्ता, मग नावाच्या स्पेलिंगमध्ये हेराफेरी, निलेश घायवळच्या पासपोर्टमधून चकीत करणारा खुलासा…


पुणे : पुण्यातील गुंड निलेश बन्सीलाल घायवाल, ज्यावर अनेक गुन्हेगारी खटले सुरू आहेत, त्याने अहिल्यानगर पोलिसांकडून निगेटिव्ह अ‍ॅड्रेस व्हेरिफिकेशन रिपोर्ट मिळूनही बेकायदेशीरपणे पासपोर्ट मिळवला आणि तो लंडनला पळून गेला असल्याची माहिती समोर आली आहे.

पण कुख्यात गुंड निलेश घायवळने पुण्यातील गंभीर गुन्ह्यांमुळे पासपोर्ट मिळणे अवघड असल्याचे लक्षात येताच बनावट कागदपत्रांचा आधार घेतला. यासाठी त्याने नावात बदल करून ‘घायवळ’ऐवजी ‘गायवळ’ असे नमूद केले आणि अहिल्यानगरमधील खोटा पत्ता दाखवत २३ डिसेंबर २०१९ रोजी तात्काळ पासपोर्टसाठी अर्ज दाखल केला होता.

निलेश घायवळवर पुण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याने पासपोर्ट मिळणार नाही हे ओळखून त्याने पासपोर्ट मिळवण्यासाठी अहिल्यानगरमधील खोटा पत्ता वापरायचं ठरवलं. त्याने २३ डिसेंबर २०१९ ला पुणे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाकडे तात्काळ पासपोर्टसाठी अर्ज केला‌.

दरम्यान, त्यासाठी त्याने नावात देखील बदल केला. निलेशने त्याच नाव घायवळ ऐवजी गायवळ असं अर्जावर नमुद केलं. म्हणजे Ghaywal या नावातील h काढून Gaywal असं केलं. त्याचबरोबर अहिल्यानगरच्या कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खोटा पत्ता त्याने नमुद केला. त्याने गौरी घुमटानंदी बाजार, कोतवाली, माळीवाडा रोड ४१४००१ असा पत्ता दिला.

पासपोर्ट कार्यालयाकडून घायवळचा अर्ज तपासणीसाठी कोतवाली पोलीसांकडे पाठवण्यात आला असता कोतवाली पोलीसांच्या मते त्यांनी घायवळने दिलेल्या पत्त्यावर जाऊन पाहणी केली. मात्र त्यांना निलेश घायवळ त्याठिकाणी रहात असल्याचे आढळून आले नाही. त्याचबरोबर निलेश घायवळ सोबत त्यांचा संपर्क देखील झाला नाही. मात्र आश्चर्य म्हणजे कोतवाली पोलीसांनी पासपोर्ट कार्यालयाला Not available एवढाच अभिप्राय पाठवला.

त्याहुन आश्चर्य म्हणजे पासपोर्ट कार्यालयाने घायवळला तात्काळ पासपोर्टसाठीचे इतर निकष वापरुन १६ जानेवारी २०२० ला पासपोर्ट मंजुर केला आणि घायवळला पासपोर्ट मिळाला. त्यानंतर २०२१ मध्ये निलेश घायवळला पुण्यातील एका दरोड्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आणि मकोका कायद्या अंतर्गत त्याच्यावर कारवाई करण्यात आली. पुढच्यावर्षी म्हणजे २०२२ मध्ये घायवळला त्या गुन्ह्यात न्यायालयाकडून जामीन मिळाला.

तो देताना न्यायालयाने घायवळला त्याचा पासपोर्ट पोलीसांकडे जमा करण्याचे आदेश दिले होते. मात्र घायवळ ने त्याचा पासपोर्ट जमा केला नाही आणि पोलीसांनी देखील जमा करुन घेतला नाही. हाच पासपोर्ट वापरुन सप्टेंबर महिन्याच्या मध्यावर निलेश घायवळ तीन महिन्यांचा व्हिजा मिळवून युरोपला फिरायला गेला‌.

पुणे पोलिसांना गुंगारा देऊन निलेश घायवळ ९० दिवसांच्या व्हिसावर स्वित्झर्लंडमध्ये फिरत असल्याची माहिती समोर आली आहे. कोथरूड भागात किरकोळ वादातून एका तरुणावर गोळीबाराच्या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला गुंड निलेश घायवळ ९० दिवसांच्या व्हिसावर स्वित्झर्लंडला गेल्याचे समोर आले आहे. अहिल्यानगरमधून त्याने ‘तत्काळ’ पासपोर्ट मिळविले आहे.

या पासपोर्ट प्रकरणाचा तपास पुणे पोलीस करीत आहेत. एवढे गुन्हे दाखल असताना पासपोर्ट, व्हिसा कसा मिळाला, याचा शोध पुणे पोलीस घेत आहे. घायवळ याला अटक करण्यासाठी पोलिसांनी ‘लूक आऊट’ नोटीस बजावली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!