नवीन वर्षातील पहिलाच दिवस नागपूरसाठी धक्कादायक!! इंजिनिअर तरुणाने केला आई वडिलांचा खून…


नागपूर : एका इंजिनीयर तरुणाने आपल्या आई वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक उघडकीस आली आहे. नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी ही धक्कादायक घटना नागपुरातून समोर आली आहे. या घटनेमुळे नागपूर हादरले आहे.

लीलाधर डाखोळे आणि अरुणा डाखोळे असे मृत आई वडिलांचे नावे आहेत. उत्कर्ष डाखोळे असे हत्या करणाऱ्या आरोपी मुलाचे नाव आहे. पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, उत्कर्ष वडिल लीलाधर डाखोळे कोराडी थर्मल प्लांटमध्ये टेक्नीशियन होते. तर उत्कर्षची आई अरुणा डाखोळे प्राइमरी शाळेत शिक्षिका होत्या. आरोपी उत्कर्ष ६ वर्षापासून इंजीनियरिंग शिकत होता. मात्र, त्याचे काही पेपर बॅक होते. ते पास करण्यात तो अपयशी ठरत होता.

त्यामुळे त्याचे आई-वडील त्याला दुसरे शिक्षण घेण्याकरता. तसेच इतर काही करण्याकरता आग्रह करत होते. मात्र, त्यामुळे त्याची नाराजी होती. आई-बाबांना सोबत त्याचे सतत खटके उडत होते. याच रागातून २६ डिसेंबरला दुपारी एक वाजता त्याने आईची हत्या केली.

यानंतर संध्याकाळी पाच नंतर चाकूने वार करत वडिलांची देखील त्याने हत्या केली. वडिलांची हत्या केल्यानंतर त्यानं बहिणीला आई-वडील मेडिटेशन करता बंगळूरूला मेडिटेशनला गेले असल्याचे सांगितले.

दरम्यान बुधवारी त्यांच्या घरातून दुर्गंधी आल्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवल्यावर ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांना दोन मृतदहे आढळून आले. दरम्यान उत्कर्ष कोणती नशा करत होता का याचाही तपास पोलीस करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!