अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प मांडला अन् सोशल मीडियावर मिम्सने धुमाकूळ घातला!! मोगॅम्बो खुशsss हुआ…


नवी दिल्ली : एनडीए आघाडीच्या मोदी सरकारचा पहिला पूर्ण अर्थसंकल्प आज १ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता सादर झाल्यानंतर इंटरनेटवर चर्चेचा विषय बनला आहे. अर्थसंकल्पाबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. निर्मला सीतारामन यांच्याबद्दलच्या मीम्सने इंटरनेट भरले आहे.

अशा स्थितीत अर्थसंकल्पाचा दिवस आहे आणि सोशल मीडियावर काही नवीन पाहायला मिळत नाही. अर्थसंकल्पाच्या सुरुवातीपासून ते अर्थसंकल्पीय भाषण संपेपर्यंत मीम्सने इंटरनेटवर चांगलाच धुमाकूळ घातला, त्यानंतर लोकांना अनेक मीम्स पाहायला मिळाले.

या अर्थसंकल्पामध्ये टॅक्समध्ये सर्वांत मोठी घोषणा केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पादरम्यान १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर नसल्याची घोषणा करताच सोशल मीडियावर आनंदाची लाट उसळली. या घोषणेनंतर सोशल मीडियावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे कौतुक होत आहे. सोशल मीडियावर मीम्स व्हायरल झाल्या आहेत.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी उत्पन्न करात मोठी सवलत जाहीर केली आहे. यात १२ लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही, अशी घोषणा केली. ही बातमी सोशल मीडियावर येताच #नो टॅक्स हा हॅशटॅग व्हायरल झाला होता.

यानंतर आता नेटक-यांनी मीम्सच्या माध्यमातून त्यांच्या भावना शेअर केल्या आहेत. मध्यमवर्गीयांनी आता केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांचे कौतुक होत असून मोगॅम्बो खुश हुआ आणि कभी खुशी कभी गम चित्रपटातील मीम्स व्हायरल होत आहेत.

व्हायरल झालेले मीम्स पुढील प्रमाणे..

मौगेंबो खुश हुआ…

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!