मोठी बातमी! अखेर वाल्मिक कराड पोलिसांना शरण, संतोष देशमुख हत्या प्रकरणी घडामोडींना वेग…

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. तसेच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचे बोलले जात आहे.
त्यांना अटक का केली जात नाही? असा सवाल राज्यभरातून उपस्थित केला जात असतानाच आता या प्रकरणात मोठी अपडेट आली आहे. ती म्हणजे वाल्मिक कराड हा आता पुणे पोलिसांना आणि सीआयडीला शरण आला आहे. नुकतंच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
दरम्यान, वाल्मिक कराड अखेर पोलिसांच्या ताब्यात आहे. तो आज शरण आल्याची माहिती देण्यात आली आहे. सीआयडीसमोर वाल्मिक कराडने शरणागती पत्करल्याचे सांगितले जात आहे. वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या प्रकरणी त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
संतोष देशमुख आतापर्यंत चार आरोपीला अटक करण्यात आली होती. तर तीन आरोपी फरार होते. या प्रकरणाचा तपास सीआयडी करत असून गेल्या ४ दिवसांपासून सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी जिल्ह्यात तळ ठोकून आहेत. या प्रकरणाचा मास्टरमाईंड म्हणून वाल्मिक कराडचे नाव घेतले जात आहे.
सीआयडीने वाल्मिक कराडच्या भोवती तपासाचा फास आवळला. संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर वाल्मिक कराडचे नाव घेऊन आरोप होऊ लागले होते. सीआयडीने आपल्या वाल्मिक कराडच्या निकटवर्तीयांची कसून चौकशी सुरू केली होती.