अखेर सरकारच्या प्रयत्नांना आलं यश! येमेनमध्ये कैद असलेल्या केरळच्या नर्स निमिषा प्रिया हिची फाशी टळली, नेमकं काय घडलं?

नवी दिल्ली : येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रिया यांना होणाऱ्या फाशीपासून वाचवण्यासाठी केंद्र सरकारने सर्व प्रयत्न केले. याबाबत आता भारतीय नर्स निमिषा प्रियाची येमेनमध्ये फाशी टळली आहे. उद्या निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा सुनावली जाणार होती. मात्र ही शिक्षा पुढील आदेश येईपर्यंत सुनावली जाणार नसल्याने निमिषा प्रियाला दिलासा मिळणार आहे.

निमिषा प्रिया या केरळ येथील असून 2008 पासून येमेनमध्ये नर्स म्हणून कार्यरत होत्या. त्या येमेनमध्येच राहून एका स्थानिक नागरिकासोबत नर्सिंग होम चालवत होत्या. 2017 मध्ये स्थानिक येमेन नागरिक तलाल अब्दो मेहदी याच्या हत्येच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली होती.
आरोपामध्ये त्या मृतदेहाचे तुकडे करून अंडरग्राउंड टाकीत टाकल्याचा आरोप आहे. निमिषाने मात्र सांगितले की, हा प्रकार आत्मरक्षणासाठी केला गेला. तिच्या म्हणण्यानुसार, संबंधित व्यक्ती तिच्यावर शारीरिक अत्याचार करत होता. यामुळे याबाबत तपास सुरू आहे.

नंतर तिचा पासपोर्ट काढून घेतला होता. सध्या निमिषा प्रिया सना सेंट्रल तुरुंगात बंद आहे. तिची फाशी 16 जुलै 2025 रोजी निश्चित करण्यात आली होती. याबाबत सर्वोच्च न्यायालयात अंतिम अपील देखील फेटाळण्यात आले होते. याबाबत केरळचे मुख्यमंत्री देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संपर्कात असून याबाबत मागणी करत होते.
दरम्यान, निमिषा प्रियाच्या कुटुंबाने तिला वाचवण्यासाठी पिडीत व्यक्ती तलाल अब्दो महदीच्या कुटुंबाला ब्लड मनी म्हणून ८ कोटी ६ लाख रूपये देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. असे असताना हत्या झालेल्या व्यक्तीच्या परिवाराने हे पैसे घेण्यास नकार दिल्याची माहिती आहे.