वडील अन् आजोबा जेलमध्ये, आता मुलाला लागला भलताच नाद, पुण्यात सलग धक्कादायक १५ घटना, नेमकं काय घडलं?


पुणे : पुण्यातील येरवडा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. केवळ मौजमजेसाठी एका अल्पवयीन मुलाने सायकल चोरीचा धडाका लावत परिसरात खळबळ उडवली आहे. या मुलाकडून तब्बल १५ सायकली चोरी झाल्याचे समोर आले असून नागरिकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली होती.

महाराष्ट्र हौसिंग बोर्ड आणि नागपूर चाळ परिसरात सतत घडणाऱ्या सायकल चोरीच्या घटनांमुळे स्थानिक त्रस्त झाले होते. अखेर येरवडा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने या प्रकरणाचा छडा लावला आणि संबंधित विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले.

तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, हा मुलगा नवी खडकी परिसरात आपल्या आजीसोबत वास्तव्यास आहे. आईचे निधन झाले असून वडील आणि आजोबा दोघेही वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये सध्या कारागृहात आहेत. घरात योग्य मार्गदर्शनाचा अभाव असल्याने तो चुकीच्या मार्गावर गेल्याचे तपासात समोर आले आहे.

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे या मुलाचा शोध घेतला आणि त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीच्या एकूण १५ सायकली जप्त केल्या आहेत. ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली येरवडा पोलीस ठाण्याच्या पथकाने पार पाडली. पुढील तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!