ब्रेकिंग! सप्तश्रृंगी गड घाटात भीषण अपघात; बस ४०० फूट दरीत कोसळली, १ महिला ठार
नाशिक : समृद्धी महामार्गावर बुलढाण्याजवळ झालेल्या भीषण अपघातात २५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच नाशिकच्या सप्तश्रृंगी गड घाटात बसला अपघात झाला असून अपघातात एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
एस टी बस सप्तशृंगी गडावरून खामगावच्या दिशेनं निघाली होती. त्यावेळी घाटातील गणपती टप्प्यावरुन बस थेट दरीत कोसळली. बसमध्ये 22 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मात्र अद्याप अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे अपघातस्थळी रवाना झाले आहेत.
मिळालेल्या माहिती नुसार, सप्तश्रृंगी गडावरील स्थानिक रहिवाशी आणि शासकीय यंत्रणांकडून मदतकार्य सुरू झालं आहे. अपघातग्रस्त बस खामगाव आगाराची असून काल सकाळी ८:३० वाजता ही बस सप्तशृंगी गडाच्या दिशेनं रवाना झाली होती. त्यानंतर बस सप्तशृंगी गडावर रात्री मुक्कामाला होती.
त्यानंतर पुन्हा सप्तशृंगी गड ते खामगाव (बुलढाणा) असा बसचा प्रवास सुरू झाला होता. सप्तशृंगी गडावरून खाली येत असतांना घाटात गणपती टप्प्यावरुन थेट दरीत कोसळली त्यामुळे बसचा मोठा अपघात झाला असून बस थेट ४०० फूट दरीत कोसळली आहे.
सकाळी सप्तशृंगी गडावरून खामगाव ला निघालेली होती. गड उतरत असताना गणपती टप्प्यावरून बस खाली कोसळली असून तब्बल ४०० फूट ती गेली आहे बसमध्ये जवळपास २२ प्रवासी असल्याचे समजते आहे. तर या अपघातात एक महिला ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे.