पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या मुलाचा देशात डंका!! अवघ्या 22 व्या वर्षी UPSC ची परीक्षा पास, देशात 26 वा क्रमांक…


पुणे : कोणतेही खाजगी क्लास न लावता अवघ्या बावीसाव्या वर्षी यूपीएससीसारख्या अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या नागरी सेवा परीक्षेत देशभरातून २६ वा क्रमांक पटकावणारा पुण्याचा शिवांश जागडे याने आपलं स्वप्न पूर्ण केले आहे. यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. शिवांशने पहिल्याच प्रयत्नात हे यश साध्य करून दाखवले.

तो आज तरुणाईसाठी प्रेरणास्थान ठरत आहे. देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नातील ही परीक्षा अनेकांसाठी वर्षानुवर्षे मेहनत करूनही गाठता न येणारे शिखर असते. खासगी क्लासेस अथवा मार्गदर्शन संस्था न लावता स्वयंअध्ययनाच्या आधारे त्याने ही कामगिरी केली आहे. त्याची ही यशोगाथा केवळ व्यक्तिगत यशापुरती मर्यादित न राहता, अनेक तरुण अभ्यासूंच्या प्रवासात दीपस्तंभ ठरू शकते. शिवांशचे शालेय शिक्षण पुण्यात पार पडले. त्याने फर्ग्युसन महाविद्यालयातून गणित विषयात पदवी प्राप्त केली.

पदवीच्या पहिल्या वर्षात असतानाच शिवांशने नागरी सेवा परीक्षेचे स्वप्न पाहिले होते. त्यामुळे त्याने शिक्षणासोबतच यूपीएससीसाठीचे नियोजन सुरू केले. त्याने कोणत्याही क्लासवर विसंबून न राहता अभ्यासाचा संपूर्ण भार स्वतःच्या खांद्यावर घेतला. दिवसातून 15 तास अभ्यास करून त्याने हे यश मिळवले आहे.

शिवांश मूळचा पुणे जिल्ह्यातील पानशेतजवळच्या रुळे या गावचा आहे. त्याच्या कुटुंबाचा शासकीय सेवेशी कोणताही पूर्वीचा संबंध नाही. त्याचे वडील व आई शेती व व्यवसाय करत आहेत. ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या या कुटुंबातील मुलाने यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. शिवांशच्या यशामागे त्याच्या कुटुंबाचेही मोठे योगदान आहे.

या तरुणासाठी शासकीय सेवेसाठीची वाटचाल सोपी नव्हती. पण त्याच्या आई-वडिलांनी त्याला मानसिक आणि सामाजिक पाठिंबा दिला. घरच्यांनी त्याच्या अभ्यासाच्या गरजांनुसार वातावरण निर्माण केले आणि त्याच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवला. त्याच्या या यशानंतर अनेकांची त्याचे कौतुक केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!