शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांचेही अजित पवारांच्या सुसार सूर!! म्हणाले, कर्जमाफी करत राहणे हा शेतीवरचा उपाय नाही….


बारामती : गेल्या काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार नाही असं वक्तव्य केलं होतं. तसेच शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पैसे भरण्याचे देखील आवाहन केले होते. यामुळे कर्जमाफी होणार नाही हे निश्चित झाले आहे.

यावर आता शेतकरी नेते रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांनी देखील मोठा वक्तव्य केलं आहे. कर्जमाफी करणे हा शेतीवरचा उपाय नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. सदाभाऊ खोत म्हणाले, आजच जे कर्ज आहे, ते शेतकऱ्यांच्या चुकीमुळे नाही तर ते सरकारच्या धोरणांमुळे आहे.

या कर्जाची जबाबदारी केंद्राने आणि राज्याने घ्यावी, परंतु कर्जमाफी करत राहणे हा शेतीवरचा उपाय नाही, असंही ते म्हणाले. शेतकऱ्यांचं दारिद्र्य घालवायचं असेल तर घटनेतील शेड्यूल 9 रद्द  करावे लागेल. मूळ संविधान जनतेसमोर ठेवावे लागेल. शेतकरी विरोधी जे कायदे आहेत ते काढून टाका. आजचा आवश्यक वस्तू कायदा, जमीन कमाल धारणा कायदा हे सर्व कायदे काढून टाका.

बंधने उठवली की शेतकऱ्यांच्या कंपन्या उभ्या राहतील. परंतु, हे कायदे रद्द केले तर शेतकऱ्यांच्या जमिनी संपुष्टात येतील, शेतकरी भूमिहीन होईल या भंपक कल्पना काही शेतकरी नेते मांडत आहेत ते पूर्णपणे चुकीच आहे. शेतकऱ्याला जागतिक बाजारपेठा खुल्या झाल्या पाहिजेत, जगातील जागतिक तंत्रज्ञान त्याला मिळालं पाहिजे.

मोठी गुंतवणूक शेतीत झाली तरच शेती तग धरू शकते, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले. तसेच, आजच जे कर्ज आहे ते शेतकऱ्यांच्या चुकीमुळे नाही तर ते सरकारच्या धोरणांमुळे आहे. असेही ते म्हणाले, यामुळे कर्जमाफी होणार अशी चिन्हे तरी सध्या दिसत नाहीत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!