प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकरांच्या लेकीच्या साखरपुड्याची तुफान चर्चा ; इंदोरीकरांचे मानधन किती?

पुणे : प्रसिद्ध कीर्तनकार आणि समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर सध्या त्यांच्या लेकीच्या साखरपुड्यामुळे चांगले चर्चेत आले आहे.लग्न साधे करा, असा संदेश देणाऱ्या इंदोरीकर महाराजांनी मात्र, आपल्या लेकीचा साखरपुडा अत्यंत थाटामाटात केला. हेच नाही तर सोन्याचे ढिगभर दागिने, रथात लेकीचे आणि जावयाचे आगमन आणि बरेच काही या साखरपुड्यात असल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.त्यामुळे इंदोरीकर महाराज एका किर्तनाच्या कार्यक्रमासाठी नेमके पैसे घेतात तरी किती? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

इंदोरीकर महाराजांचे किर्तन म्हटले की, लोक कित्येक किलो मीटरचा प्रवास करू ऐकण्यासाठी येतात. शेतकऱ्यांनी मुलांची लग्न साध्या पद्धतीने करायला पाहिजे, असे अनेकदा इंदोरीकर महाराज सांगतात.महाराजांचे किर्तन तुमच्या गावात घ्यायचे असेल तर दोन दोन वर्ष त्याकरिता तुम्हाला वाट बघावी लागते. साधारणपणे एका किर्तनाच्या कार्यक्रमासाठी इंदोरीकर महाराज 60 हजार ते 1 लाखाच्या पुढे मानधन घेतात, अशी माहिती समोर आली आहे.

दरम्यान इंदोरीकर महाराजांनी ज्याप्रकारे आपल्या लेकीचा साखरपुडा केला, त्यानंतर त्यांच्या किर्तनाच्या मानधनाची चर्चा जोरदार रंगू लागली आहे. इंदोरीकर महाराज इतर किर्तनकारांपेक्षा मानधन अधिक घेतात, असे कायमच सांगितले जाते. मात्र, त्यांचे मानधन 60 हजार ते 1 लाखाच्या पुढे मानधन घेतात.दरम्यान काही दिवसांपूर्वीच त्यांनी म्हटले होते की, गाैतमी पाटील हिच्या नृत्यासाठी लोक तीन लाख रूपये देतात आणि आम्ही थोडे मानधन वाढवले तरीही त्यांची कटकट सुरू होते. कुठेही किर्तन ठेवायचे असेल तर लोकांची पहिली पसंती ही फक्त आणि फक्त इंदोरीकर महाराजांनाच असते.

