बीडमध्ये फडणवीसांकडून धनंजय मुंडे यांचा असा उल्लेख की संपूर्ण बीडमध्ये होतेय चर्चा, नेमकं घडलं काय?


बीड : गेल्या अनेक दशकांपासून बीडमध्ये रेल्वे सेवा सुरू करावी, अशी मागणी केली जात होती. आता ही मागणी शेवटी प्रत्यक्षात उतरली आहे. कारण आज (ता.१७ सप्टेंबर) बीड ते अहिल्यानगर या मार्गाने जाणारी रेल्वे सुरू करण्यात आली आहे.

गेल्या कित्येक दिवसांपासून या रेल्वेमार्गाचे काम चालू होते. शेवटी आता या रेल्वेचे उद्घाटन करण्यात आले आहे. या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले भाषण सध्या मोठ्या चर्चेचा विषय ठरले आहे.

विकासकामांसह राजकीय संदर्भांनी रंगलेल्या या भाषणात फडणवीस यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा “आमचे मित्र” असा उल्लेख केला. यानंतर उपस्थित प्रेक्षकांनी जल्लोष केला आणि या एका वाक्यावरून जिल्हाभरात चर्चा सुरू झाली आहे.

फडणवीसांनी सुरुवातीला पंकजा मुंडे यांचे कौतुक करत त्यांना “गोपीनाथ मुंडेंचा वारसा समर्थपणे पुढे नेणारी नेत्री” म्हटले. त्यानंतर खासदार रजनी पाटील आणि बजंरग सोनवणे यांचा उल्लेख केला. मात्र, धनंजय मुंडे यांचे नाव घेताना त्यांनी खास करून “आमचे मित्र धनंजय मुंडे” असं म्हटल्यावर प्रेक्षकांमध्ये टाळ्यांचा गडगडाट झाला. यावरून हा उल्लेख कौतुकाचा होता की, सूचक इशारा, याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

दरम्यान, अलीकडेच सरपंच संतोष देशमुख खूनप्रकरणात धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीयाचे नाव समोर आल्यानंतर त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. भाजप आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण जोरदार लावून धरल्याने मुंडे अडचणीत आले. अशा पार्श्वभूमीवर फडणवीसांनी केलेला “मित्र” हा उल्लेख अनेकांना राजकीय पेचात टाकणारा ठरत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!