उरुळी कांचन येथे आजपासून अजिंक्य चॅरिटेबल फाउंडेशनच्यावतीने डोळे तपासणी शिबीर सुरु; अजिंक्य कांचन यांची माहिती …

उरुळी कांचन : नागरिकांना डोळे आल्याची लवकर निदान होऊन त्वरित उपचार मिळावा. यासाठी अजिंक्य चॅरिटेबल फाउंडेशन व सिद्धिविनायक हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने उरुळी कांचन (ता. हवेली) येथे मोफत डोळे तपासणी शिबीर आज बुधवार (ता.०९) पासून सुरु करण्यात आली आहे. अशी माहिती अजिंक्य चॅरिटेबल फाउंडेशनचे अजिंक्य कांचन यांनी दिली आहे.
पूर्व हवेलीत गेल्या काही दिवसांपासून डोळे येण्याची साथ सुरू आहे. त्यामुळे डोळ्यांच्या औषधांची आणि ‘ड्रॉप’ची मागणी वाढली आहे. अचानक मागणी वाढल्याने शहरात सध्या विविध कंपन्यांच्या ‘आय ड्रॉप’चा तुटवडा जाणवत आहे.
तसेच ही साथ वेगाने पसरत असून घरोघरी डोळे आलेले रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे अजिंक्य चॅरिटेबल फाउंडेशनच्या `वतीने या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, अजिंक्य चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने औषधे, गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. या शिबिराला उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुप व ग्रामपंचायत उरुळी कांचन यांचे विशेष सहकार्य असल्याचे अजिंक्य कांचन यांनी सांगितले.