धनंजय मुंडे यांच्या ड्रायव्हरच्या नावावर मगरपट्टा सिटीतील संपूर्ण फ्लोअर, आता डोळे फिरवणारी माहिती आली समोर….

बीड : बीडच्या संतोष देशमुख हत्याप्रकरणी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यांची मंत्रिपदावरुन हाकलपट्टी करण्यात यावी या मागणीने जोर धरला आहे. यामुळे आता ते राजीनामा देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या प्रकरणात भाजपचे आमदार सुरेश धस रोज अनेक प्रकारचे खुलासे करत आहेत. मुंडेंच्या ड्रायव्हरच्या नावावर मगरपट्टा सिटीतील अख्खा फ्लोअर तसेच, मुंडेंची अनेक संपत्ती ही त्यांची पत्नी आणि वाल्मिक कराड यांच्या संयुक्त नावे असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंविरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. त्यांनी मुंडेंच्या संपत्तीविषयी धक्कादायक खुलासा केला. यामुळे याबाबत माहिती झाली आहे. मगरपट्टा सिटी शेजारी कुठेतरी मोठा फ्लॅट आहे, ड्रायव्हरच्या नावावर अख्खा फ्लोअर बुक आहे.
अनेक प्रॉपर्टीमध्ये आमच्या इकडच्या जैन मल्टीस्टेटची चौकशी चालू आहे त्याच्या बहुतांश प्रॉपर्टी मध्ये धनंजय मुंडे यांच्या सौभाग्यवती आणि वाल्मिक कराड यांची संयुक्त नावे बऱ्याच अंशी आहेत, असा मोठा दावा देखील त्यांनी केला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यासंदर्भात मी एसीपीकडे चौकशी करणार आहे. असेही सुरेश धस म्हणाले, दरम्यान, वाल्मिक कराड यांची चौकशी सुरू असून यामध्ये काही उघड होणार का? हे देखील लवकरच समजेल. याबाबत एक आरोपी अजून फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत.