मेहंदीच्या बहाण्याने रात्री घरात शिरला, जिवे मारण्याची धमकी अन् विवाहितेसोबत धक्कादायक कृत्य, साताऱ्यात खळबळ…

सातारा : राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक घटना समोर आली आहे.
मेहंदी काढण्याच्या बहाण्याने एका महिलेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना साताऱ्यात घडली आहे. विवाहित महिला घरात एकटी असल्याचं पाहून नराधमाने तिच्यावर जबरदस्ती केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल केली असून आरोपीचा शोध सुरु आहे. या घटनेने साताऱ्यात संतापाची लाट उसळली आहे.
ओळखीचा फायदा घेत मेहंदी काढण्याच्या बहाण्याने पीडित महिलेला मेहंदीचे फोटो पाहण्यास मागितले. त्यावेळी विवाहित महिला घरात एकटी असल्याचे पाहून जीवे मारण्याची धमकी देत आरोपीने तिच्यावर अत्याचार केला.
ही घटना बुधवारी रात्री सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती आहे. शंकर बदु जाधव (रा. मसूर, ता. कराड, सातारा) असं गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले की, या गुन्ह्यातील पीडिता आपल्या पतीसह भाड्याने राहण्यास आहे. या पीडितेचा पती एका हॉटेलवर काम करतो. पीडिता रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घरात एकटीच असताना खोलीचा दरवाजा वाजला. पीडितीने खोलीचा दरवाजा उघडून पाहिले असता थोडा परिचित असणारा शंकर बदू जाधव हा व्यक्ती दरवाज्यासमोर तिला दिसला.
दरम्यान, त्यावेळी त्याने पीडितेस तुम्ही मेहंदी काढता का? तुम्ही मेहंदीची ऑर्डर घेता का? मेहंदीचे क्लास घेता का? असे प्रश्न विचारले. त्यावेळी पीडित महिलेने मेहंदीचे ऑर्डर घेते; परंतु मेहंदीचे क्लास घेत नाही, असे सांगितले.
त्यावेळी शंकर जाधव याने माझ्या ओळखीच्या एकीला क्लास लावायचा आहे, किती फी घेणार? असे विचारले. त्यावेळी त्याला पीडित महिलेने क्लास घेत नाही, मी फक्त ऑर्डर घेते, असे सांगितले. त्यावेळी त्याने पीडित महिलेला मेहंदीचे फोटो पाहण्यास मागितले.
त्यावेळी त्याला महिलेने मोबाईलमधील मेहंदीचे फोटो दाखवले. त्यावेळी त्याने ती महिला घरात एकटी असल्याचा फायदा घेत तिला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. या घटनेची नोंद पीडित विवाहितेने मसूर पोलिसात दिली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.