इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीला लॉजवर नेलं, गुंगीचं औषध दिलं अन् अब्रूचे लचके तोडले; जीवे मारण्याची धमकी, धक्कादायक घटनेने महाराष्ट्रात खळबळ

सांगली : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सांगली जिल्ह्याच्या ईश्वरपूर शहरातून सध्या अशीच एक घटना समोर आली आहे.
इथं इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणाऱ्या एका २० वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे. आरोपींनी पीडितेला एका लॉजवर घेऊन जात तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. अत्याचार करण्यापूर्वी आरोपींनी तिला गुंगीचं औषध दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी ईश्वरपूर पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.

शार्दुल विद्यापती पाटील (वय २१, रा. रेठरेधरण) आणि प्रथम सचिन पाटील (रा. ईश्वरपूर) असं संशयित आरोपींची नावं आहेत. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी शार्दुल पाटीलला तत्काळ अटक केली आहे. तर दुसरा आरोपी प्रथम पाटील हा सध्या फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. एका २० वर्षीय विद्यार्थिनीवर अशाप्रकारे सामूहिक अत्याचार झाल्याने कॉलेज प्रशासनासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित २० वर्षीय तरुणी ही मूळची सातारा जिल्ह्यातील रहिवासी असून ती ईश्वरपूर येथे अभियांत्रिकीचं शिक्षण घेत आहे. संशयित आरोपींनी पीडितेसोबत असलेल्या ओळखीचा गैरफायदा घेतला. आरोपींनी तिला गोड बोलून ईश्वरपूर येथील कामेरी रस्त्यावरील एका लॉजवर नेलं. तिथे तिच्या नकळत शीतपेयातून गुंगीचे औषध देण्यात आलं. तरुणीला गुंगी येताच दोन्ही मित्रांनी आळीपाळीने तिच्यावर सामूहिक अत्याचार केला.
अत्याचार केल्यानंतर आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत. तर घडलेला संपूर्ण प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारू, अशी धमकी देखील आरोपींनी तरुणीला दिली. मात्र आरोपींच्या धमकीला न घाबरता पीडित तरुणीने तातडीने ईश्वरपूर पोलीस ठाणं गाठले आणि आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. एका आरोपी
