एनकाउंटर स्पेशालिस्ट दया नायकची पुन्हा मुंबई पोलिस दलात एन्ट्री…!


मुंबई : पोलीस निरीक्षक दया नायक हे एनकौंटर स्पेशालिस्ट अधिकारी म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी आता पर्यंत 70 पेक्षा जास्त एनकाउंटर केले आहेत. चार वर्षांपूर्वी त्यांची बदली मुंबई बाहेर करण्यात आली होती. सध्या दया नायक हे महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकात कार्यरत आहेत. आज जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार काही पोलीस अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये दया नायक यांचाही समावेश असून ते मुंबई पोलिस दलात रुजू होणार आहेत.

 

 

 

 

 

दया नायक यांची  २०२१ मध्ये अँटिलिया-मनसुख हिरेन प्रकरणानंतर त्यांची बदली एटीएसमधून गोंदिया येथे करण्यात आली होती. ही बदली प्रशासकीय असल्याचे कारण देण्यात आले होते. मात्र, बदलीच्या या आदेशाला नायक यांनी मॅटमध्ये आव्हान दिले होते. मॅटने या बदलीच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. त्यानंतर दया नायक एटीएसमध्ये कार्यरत होते.

दरम्यान , आज पोलीस दलात काही अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. दौलत साळवे, ज्ञानेश्वर वाघ यांचीही दहशतवादविरोधी पथकातून मुंबई पोलीस दलात बदली करण्यात आली आहे. तर, नागिन काळे, कैलास बोंद्रे, अशोक उगले, रमेश यादव, मुरलीधर करपे यांच्या बदल्या रद्द करण्यात आल्या आहेत.

दया नायक यांची ओळख एक एन्काऊंटर स्पेशलिस्ट म्हणूनही आहे. दया नायक यांनी अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या असून अनेक एन्काऊंटरही केले आहेत. मात्र वरिष्ठांच्या मर्जीतील अधिकारी म्हणून त्यांची बदली गोंदियाला करण्यात आली होती. त्यामुळे दया नायक यांनी मॅट कोर्टात धाव घेतली होती.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!