Elvish Yadav : बिग बॉस विजेता एल्विश यादवच्या अडचणीत वाढ, रेव्ह पार्टीत सापाचे विष आणि परदेशी मुली पुरवल्याचा आरोप, गुन्हा दाखल होताच उडाली खळबळ


Elvish Yadav ‘बिग बॉस ओटीटी २’ चा विजेता आणि युट्यूबर एल्विश यादव अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. एल्विशविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याने एका रेव्ह पार्टीत सापाचे विष आणि परदेशी तरुणींचा पुरवठा केल्याचा आरोप आहे. नोएडाच्या सेक्टर ४९ पोलीस ठाण्यात यूट्यूबर एल्विश यादवविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, नोएडा पोलीस आणि वन विभागाच्या पथकाने साप करणाऱ्या पाच गारुडींना अटक केली. यावेळी त्यांच्याकडून सापांचे काही विष देखील जप्त करण्यात आले. यावेळी त्यांनी हे विष एल्विश यादव याला पुरवायचे असल्याचे सांगितले. त्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली. Elvish Yadav

याप्रकरणी आता एएल्विश यादवसह ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. राहुल, टिटुनाथ, जयकरण, नारायण आणि रविनाथ अशी अटक करण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहेत.

पीपल फॉर अॅनिमल्स या एनजीओमध्ये कल्याण अधिकारी म्हणून काम करणाऱ्या गौरव गुप्ता यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलंय की एल्विश यादव त्याच्या साथीदारांसह नोएडा आणि एनसीआरमधील फार्म हाऊसवर बेकायदेशीरपणे रेव्ह पार्ट्यांचे आयोजन करत असल्याची माहिती मिळाली होती. या पार्ट्यांमध्ये परदेशी मुलींना नियमित बोलावले जाते आणि ते सापाचे विष आणि इतर अमली पदार्थांचे सेवन करतात.

या माहितीवरून आमच्या एका माहितीदाराने एल्विश यादवशी संपर्क साधला आणि त्याला नोएडामध्ये रेव्ह पार्टी आयोजित करण्यास आणि कोब्राच्या विषाची व्यवस्था करण्यास सांगितले. एल्विशने त्याच्या एजंट राहुलचा फोन नंबर दिला आणि माझं नाव सांगून बोला, तो सर्व व्यवस्था करेल असे सांगितल्याची माहिती आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!