पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इलिव्हेटेड मार्ग आता बोरीभडक पर्यंत! पुणे – छत्रपती संभाजीनगर मार्गही जोडणार…


जयदिप जाधव                                            उरुळीकांचन : पुणे ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान प्रस्तावित झालेला समृद्धी मार्ग तसेच पुणे शहरातील लोकप्रतिनिधींकडून सुरू असलेल्या मागणीचा विचार करुन हडपसर ते यवत दरम्यान च्या उन्नत मार्गात बदल करण्याचा निर्णय वरिष्ठ स्तरावर सुरू झाला असून हडपसर ते यवत होणारा इलिव्हेटेड उन्नत मार्ग दौंड तालुक्याच्या हद्दीतील बोरीभडक पर्यंतच करण्याचा निर्णय अंतिम होण्याची शक्यता असून समृद्धी मार्गाला जंक्शन स्वरूपात जोडण्याची कार्यवाही बोरीभडक हद्दीत होणार असल्याने उन्नत मार्ग भौरोबानाला ते बोरीभडक पर्यंत टेंडर प्रकिया अंतिम होण्याची जवळपास निश्चित झाल्याची खात्रीशीर वृत्त आहे.

पुणे शहराभोवतालची होणारी प्रचंड वाहतुक कोंडी लक्ष्यात घेता राज्य शासनाच्या स्तरावर हडपसर ते यवत तसेच वाघोली ते शिरुर पर्यंत दोन इलिव्हेटेड मार्ग उभारण्याचा निर्णय घेतला आहे.त्यानुसार या दोन्ही राष्ट्रीय महामार्गावर उन्नत मार्ग धर्तीवर इलिव्हेटेड मार्ग उभारण्यात येणार आहे. या दोन्ही मार्गांचा डीपीआर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने तयार केला आहे.त्यानुसार या मार्गांची टेंडर प्रक्रिया राबविण्याची तयारी सुरू आहे.

अशातच या प्रस्तावित मार्गात हडपसर ते यवत असा बदल करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे निश्चित झाले असून त्यानुसार भौरोबानाला पासून उरुळीकांचनजवळील बोरीभडक (ता.दौंड) पर्यंत महामार्गात विकसित करण्याची प्रक्रिया वरिष्ठ पातळीवर सुरू आहे. त्यानुसार बदल होऊन या भौरोबानाला ते बोरीभडक पर्यंत इलिव्हेटेड मार्ग विकसित होणार आहे. तर हा मार्ग बोरीभडक जंक्शन पुढे जमिनीवरच सहापदरी करुन कासुर्डी पर्यंत विकसित करण्यात येणार असल्याचे निश्चित झाले आहे.

पूर्वी प्रस्तावित केलेल्या मार्गातील उरुळीकांचनपासून पुढील यवत पर्यंतच्या भागात वाहतुक कोंडीचा फारसा प्रभाव नसल्याने हा मार्ग आता भौरोबालानाल्यापासून बोरीभडक पर्यंतच इलिव्हेटेड असणार आहे. या उन्नत मार्गात यापूर्वी लोणीकाळभोर पर्यंत मेट्रोचा मार्ग प्रस्तावित होता. आता मात्र उरुळीकांचनपर्यंत मेट्रोचा मार्ग करण्याची मागणी होऊ लागल्याने या मार्गात पुढील टप्प्यात अनेक बदल होण्याचे अपेक्षित असल्याची चर्चा आहे.

” पुणे ते छत्रपती संभाजीनगर असा समृद्धीमार्ग विकसित करण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे बोरीभडक येथे मार्गाला जोडणारे जंक्शन होणे क्रमप्राप्त होणार आहे. त्यामुळे मार्गात बदलाची शक्यता आहे. परंतु या उन्नत मार्ग जमिनीवरुन कासुर्डी पर्यंत सहापदरी होणार असल्याचे निश्चित आहे.”
– राहुल कुल , आमदार , दौंड

 

” हडपसर ते यवत उन्नत मार्गात बदल होणार असल्याचे नियोजन सुरू आहे. त्यादृष्टीने कार्यवाही सुरू आहे. हडपसर ऐवजी भौरोबानाला येथून इलिव्हेटेड मार्ग तयार करण्याची मागणी विचारात घेण्यात आली आहे.त्यानुसार काही बदल होणार आहे. माझ्या माहितीप्रमाणे बोरीभडक हद्दीपर्यंत असणार आहे. या मार्गात वाहतुक कोंडी कायमस्वरूपी सोडविण्यासाठी सहापदरी मार्ग व उरुळीकांचनपर्यंत मेट्रो आणण्यासाठी माझा प्रयत्न आहे”

– ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके , आमदार शिरुर-हवेली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!