मंगळवारी एकनाथ शिंदेंची भेट, शनिवारी राज ठाकरेंचा उद्धव यांना युतीचा प्रस्ताव, राजकारणात मोठ्या घडामोडी…

मुंबई : राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. अभिनेते महेश मांजरेकर यांच्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरे यांना युतीचा प्रस्ताव दिला आहे. आम्ही तयार आहोत, पण उद्धव तयार आहे का? असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला आहे. त्यामुळे आता आगामी निवडणुकीसाठी राज ठाकरे यांनी पुन्हा उद्धव ठाकरेंसमोर टाळी देण्याचा प्रस्ताव ठेवल्याचं पहायला मिळत आहे.
राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना टाळी देण्याचा प्रस्ताव दिला खरा पण आता उद्धव ठाकरे टाळी देणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. मंगळवारी रात्री उशिरा एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर हजेरी लावली होती. त्यावेळी दोघांमध्ये राजकीय विषयावर चर्चा झाल्याची माहिती होती. नंतर काही दिवसातच राजकीय घडामोडी घडत असल्याने काहीतरी घडतंय असं म्हटलं जात आहे.
आता राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंचा प्रस्ताव धुडकावून लावला की काय? अशी चर्चा देखील होत आहे. शिवसेना फुटली किंवा नाही फुटली, तर तुम्ही अजूनही एकत्र येऊ शकता का? असा प्रश्न महेश मांजरेकर यांनी विचारला. त्यावर राज ठाकरेंनी यांनी स्पष्ट उत्तर दिलं. विषय फक्त इच्छेचा आहे. माझ्या स्वार्थाचा विषय नाही, असं राज ठाकरे म्हणाले.
कुठल्याही गोष्टीसाठी आमच्यातले वाद भांडण किरकोळ, महाराष्ट्र खूप मोठा आहे. या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी आहे, असं राज ठाकरे म्हणाले. मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी बाकी सगळ्या गोष्टी शुल्लक आहेत. आपण लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे. एकत्र येणं आणि एकत्र राहणं फार कठीण आहे असं मला वाटत नाही. माझ्या इच्छेचा आणि स्वार्थाचा प्रश्न नाही, असं राज ठाकरे म्हणाले होते.
उद्धव ठाकरे म्हणाले की, जेव्हा लोकसभेवेळी आम्ही विविध मुद्यांवर भाजपला विरोध करत होतो. तेव्हाच जर विरोध केला असता तर आज केंद्रात त्यांचं सरकार बसलं नसतं. तेव्हाच जर विरोध केला असता तर राज्यातही सरकार बसलं असतं. महाराष्ट्राचे हित पाहणारे सरकार आपण केंद्रात आणि राज्यात बसले असते. असं मोठं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.