काश्मिरी आदिल शाहच्या कुटूंबासाठी एकनाथ शिंदे आले पुढे, घर बांधून ५ लाखांची मदतही करणार…


मुंबई : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप पर्यटकांना दहशतवादी हल्ल्यात जीव गमवावा लागला. या घटनेचा निषेध केला जात आहे. घटनेतील कुटुंबियांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा आहे.

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर हल्ला होत असताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पर्यटकांच्या रक्षणासाठी धावून जाणारा सय्यद आदिल हुसैन शाह या अवघ्या २० वर्षांच्या स्थानिक युवकाचा देखील दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला.

माणुसकी दाखवत धाडसाने दहशतवाद्यांना सामोरे जाणाऱ्या सय्यदच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त करतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैयक्तिकरित्या सय्यदच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत केली.

पहलगाम येथे मदतीसाठी गेलेले शिवसेना कार्यकर्ते आणि सरहद संस्थेचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून आज सय्यदच्या कुटुंबीयांना धनादेश देण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सय्यदच्या कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.

दरम्यान, अवघ्या २० वर्षाचा असलेला सय्यद आदिल पहलगाममध्ये पर्यटकांना घोड्यावरुन फिरवण्याचं काम करायचा. त्याच्या घोड्यावरुन जो प्रवासी पहलागमची सफर करत होता त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. दहशतवादी समोर आल्यानंतर सय्यद याने धाडस दाखवत एका दहशतवाद्याची रायफल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. दहशतवाद्यांनी त्याला गोळी मारल्याने त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरममध्ये फिरायला गेलेले राज्यातील अनेक पर्यटक तिथेच अडकून पडले होते. त्यांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी २३ एप्रिल रोजी रात्री उशीरा श्रीनगर येथे पोहोचले.

तिथे पोहोचताच त्यांनी विमानतळाच्या जवळच असलेल्या कॅम्पमध्ये जाऊन राज्यातील पर्यटकांची भेट घेतली. त्यांची विचारपूस करून त्यांना दिलासा दिला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!