संसदेत आज सादर होणार आर्थिक सर्वेक्षण , १ फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प…!


नवी दिल्ली : जानेवारी महिना संपत आला आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत अशा स्थितीत अर्थविश्वात चर्चा केवळ अर्थसंकल्पाबाबत होत आहे. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज मंगळवारपासून सुरू होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने होईल.

या अधिवेशनात मोदी सरकार आपल्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर करणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर द्रौपदी मुर्मू पहिल्यांदाच सेंट्रल हॉलमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार आहेत. त्यानंतर लगेचच मंगळवारीच आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या भागात 13 फेब्रुवारीपर्यंत संसदेच्या दोन्ही सभागृहात राष्ट्रपतींचे अभिभाषण आणि सर्वसाधारण अर्थसंकल्पावर चर्चा होईल. यादरम्यान पंतप्रधान संबोधनावरील चर्चेला उत्तर देतील.

पहिल्या भागात कोणतेही विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मांडले जाणार नाही किंवा मंजूर केले जाणार नाही. 13 मार्च ते 6 एप्रिल या कालावधीत वैधानिक कामकाजाचा निपटारा केला जाईल. अधिवेशनाच्या दुसऱ्या भागात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पावर चर्चा केली

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!