Earthquake Marathwada : भूकंपाने मराठवाडा हादरला! नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात भूकंपाचे धक्के, नागरिक रस्त्यावर..

Earthquake Marathwada : मराठवाड्याच भूकंपाचे धक्के जाणवल्याची घटना समोर आली आहे. मराठवाड्यातील परभणी, नांदेड, आणि हिंगोली जिल्ह्याच्या काही भागांत आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केल वर ४.२ तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली आहे.

सकाळी ६ वाजून ९ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. अनेकजण घाबरुन घराबाहेर पडले. मराठवाड्यातील १९९३ च्या भूकंपानंतरचा हा सर्वांत मोठा धक्का असल्याची माहिती आहे.
मिळालल्या माहितीनुसार भूकंपाचे केंद्र हिंगोली आहे. भूकंपाची उत्पत्ती 10 किलोमीटर खोलीवर झाली आणि त्यामुळे आसपाससचा प्रदेश देखील हादरला अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. हिंगोलीत झालेल्या या भूकंपाचे धक्के नांदेडच्या उत्तर भागात देखील जाणवले. Earthquake Marathwada

तसेच परभणी जिल्ह्यातील काही गावांना देखील या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. आज सकाळी 6 वाजून 9 मिनिटांनी हे भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती मिळत आहे. भूकंपाची तीव्रतेची रिश्टर स्केलवर ४.२ एवढी नोंद झाली आहे. भूकंपचा धक्के बसल्याने अनेक लोक घाबरून रस्त्यावर आले. यापूर्वी देखील मार्चच्याच पहिल्या आठवड्यात या भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते.
दरम्यान, या भूकंपाचे धक्के मध्यम असले तरी संपूर्ण परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. हिंगोली हा महाराष्ट्रातील कृषी महत्त्वासाठी ओळखला जाणारा जिल्हा आहे. अचानक झालेल्या भूकंपाच्या हालचालींमुळे आता परिसरातील नागरिक सावध झाले आहेत.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने या घटनेला तत्परतेने प्रतिसाद दिला. तसेच संभाव्य नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी आणि सार्वजनिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण डेटा प्रदान केला. या घटनेत आत्तापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा लक्षणीय विध्वंस झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
