शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे कांद्याचे दर 12 रुपयांवरून 15 रुपयांवर, एकीकडे काहीसा दिलासा तर एकीकडे गुन्हे दाखल….

नाशिक : लासलगाव, चांदवड, मंचर या ठिकाणी झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनांमुळे खरेदी दर १२.३५ रु वरून १५.८० रु झाला. यामुळे शेतकऱ्यांना काहीसा का होईना दिलासा मिळाला आहे. मार्केट समितीतच नाफेडमार्फत खरेदीचा निर्णय झाला, नाफेडच्या खरेदीच्या अटी शर्थी काही प्रमाणात शिथिल झाल्या.

या आंदोलनांचे यश पाहता या आंदोलणासाठी परवानग्या घेणारे, नियोजन करणारे शेतकरी, पदाधिकारी यांचे खऱ्या अर्थाने कौतुक करणे गरजेचे असताना हे सरकार मात्र त्यांच्यावर गुन्हे नोंदवत आहे. या सर्व पदाधिकाऱ्यांचा तर सर्व शेतकऱ्यांनी सत्कार करायला हवा कारण आज आंदोलनाला जे यश मिळाले आहे त्यात या लोकांची भूमिका महत्वाची राहिली आहे.
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आवाज उठवला आहे. अनेक ठिकाणी त्यांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन केले. मात्र शेतकऱ्यांना अजूनही दिलासा मिळाला नाही. यामुळे अजून तीव्र आंदोलन करणार असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले आहे.

मंचरमधील आंदोलनाप्रकरणी देवदत्त निकम यांच्यासह स्थानिक पदाधिकारी शेतकऱ्यांवर गुन्हा नोंद करण्याचे पाप या सरकारने केले आहे. कांद्याचा दर वाढावा म्हणून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर FIR करणे शोभते का ? सरकार सत्तेच्या जोरावर सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा करत असलेला प्रयत्न शोभनीय नाही, हे सरकारने ध्यानात घ्यावे, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

दरम्यान, मार्केट समितीतच नाफेडमार्फत खरेदीचा निर्णय झाला, नाफेडच्या खरेदीच्या अटी शर्थी काही प्रमाणात शिथिल झाल्या. आंदोलनाला जे यश मिळाले आहे त्यात या लोकांची भूमिका महत्वाची राहिली आहे. येणाऱ्या काळात यावरून आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे.