राज्यात दुष्काळ जाहीर होणार! ‘या’ तारखेपर्यंत निर्णय होण्याची शक्यता, शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी


मुंबई : राज्यात अवर्षणाची परिस्थिती निर्माण झाली असून, मराठवाड्यात सप्टेंबर महिन्यातच काही ठिकाणी टँकर सुरू करण्याची वेळ आली आहे. पावसाअभावी अनेक भागांमध्ये सोयाबीनची पिके करपली असून, शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे.

दरम्यान, याच पार्श्वभूमीवर राज्यातील दुष्काळाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत राज्यात दुष्काळ जाहीर केला जाऊ शकतो, अशी माहिती भाजपाचे ज्येष्ठ नेते राम शिंदे यांनी दिली आहे. दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून येत्या शनिवारपर्यंत याबाबत निर्णय होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

राज्यात निर्माण झालेल्या अवर्षणाच्या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने मदत जाहीर करण्याचे संकेत दिले आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांची मागणी रास्त असल्याचे म्हटले होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यातील लातूर आणि धाराशिव जिल्ह्याचा दौरा करून पावसाअभावी करपलेल्या पिकांची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांना दिलासा देताना सरसकट मदत देण्याचे आश्वासन दिले. शेतकऱ्यांना मदत देताना कोणतेही आढेवेढे घेतले जाणार नाहीत, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते.

अधिवेशन बोलवणार का?

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्याकडून लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून येत्या शनिवारपर्यंत दुष्काळ जाहीर होईल, असे भाजपाचे ज्येष्ठ नेते राम शिंदे यांनी म्हटले आहे.

शेतकऱ्यांना मदत करताना काही अडचणी निर्माण झाल्या तरी त्यावर चर्चा करून मार्ग काढला जाईल, असेही राम शिंदे यांनी सांगितले.

दरम्यान, कर्नाटकच्या धर्तीवर राज्यात दुष्काळी परिस्थितीवर विशेष अधिवेशन बोलवणार का, असा प्रश्न राम शिंदे यांना विचारण्यात आला. त्यावर अधिवेशन घेण्यापेक्षा प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन शेतकरी आणि नागरिकांना मदत करणे अधिक महत्त्वाचे असल्याचे राम शिंदे यांनी स्पष्ट केले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!