बारामतीकरांचा दुष्काळ मिटणार!!जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या कालव्यांच्या बंदिस्त नलिका कामाला मंत्रिमंडळाची मान्यता…

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मंत्रालयात पार पडली. यावेळी अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये बारामतीसाठी जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या कालव्यांना बंदिस्त नलिका वितरण प्रणालीत रुपांतरण करण्याच्या कामासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नियमांत २०१९ मध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे. यामध्ये जनाई शिरसाई उपसा सिंचन योजना ता. दौंड, बारामती आणि पुरंदर जि. पुणे योजनेच्या कालव्यांना बंदिस्त नलिका वितरण प्रणालीत रुपांतरण करण्याच्या कामासाठी विस्तार व सुधारणा अंतर्गत ४३८.४८ कोटी रुपयांना प्रशासकीय मान्यता.
तसेच जनाईतून दौंड, बारामती, पुरंदर तालुक्यातील अवर्षण भागात ८३५० हेक्टरला सिंचन, शिरसाईतून बारामती, पुरंदरच्या अवर्षण भागात ५७३० हेक्टरला सिंचन असा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. तसेच यावेळी पालघर जिल्ह्यातील देहरजी मध्यम पाटबंधारे प्रकल्पासाठी २ हजार ५९९ कोटी रुपयांच्या सुधारित खर्चाला मंजुरी देण्यात आली.
दरम्यान, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नियमांत २०१९ मध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे. यामुळे येणाऱ्या काळात याबाबतची कामे सुरु होणार असून याबाबतची मागणी केली जात होती अखेर या कामांना मान्यता देण्यात आली आहे.