उरुळी कांचन येथे रिक्षात बसवून फिरवून आणण्याचा बहाणा करुन ११ वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार; रिक्षाचालकावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..


उरुळी कांचन : रिक्षात बसवून फिरवून आणण्याचा बहाणा करुन एका रिक्षाचालकाने ११ वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार केल्याची घटना उरुळी कांचन (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे.

सदरचा प्रकार एप्रिल २०२३ मध्ये घडला आहे. याप्रकरणी रिक्षाचालकाच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अविनाश परडे (रा. उरुळी कांचन ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपी रिक्षाचालकाचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी यांना ११ वर्षाची मुलगी आहे. तर आरोपी अविनाश परडे याने मुलीला दोन ते तीन वेळा रिक्षात बसवून भुलेश्वर या ठिकाणी फिरायला घेऊन जायचे आमिष दाखवले. सदर ठिकाणी असलेल्या येथील झाडीत नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

दरम्यान, पिडीत मुलीने सदर घडलेल्या प्रकाराबाबत आपल्या आईला सांगितले.त्यानंतर फिर्यादी यांनी तत्काळ लोणी काळभोर पोलीस ठाणे गाठले. आणि आरोपी अविनाश परडे याच्याविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

त्यानुसार, लोणी काळभोर पोलिसांनी आरोपीच्या विरोधात बाललैंगिक अत्याचार कायद्याने (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!