गणपतीपुळे मंदिरात भाविकांसाठी ड्रेसकोड लागू, कोणत्या पोषाखाला परवानगी नाही? महत्वाची माहिती आली समोर..

गणपतीपुळे : येथील प्रसिद्ध गणपती हा सर्वांच्या आवडीचे ठिकाण आहे. निसर्ग आणि समुद्र याठिकाणी असल्याने मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची वर्दळ याठिकाणी असते. यामुळे वर्षभर आणि विशेषतः शाळेच्या सहली देखील याठिकाणी मोठ्या प्रमाणावर येत असतात. असे असताना याठिकाणी असलेल्या मंदिरात एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

गणपतीपुळे मंदिरात आता भाविकांना ड्रेसकोड लागू करण्यात येणार आहे. मंदिर प्रशासनाने भारतीय संस्कृतीला साजेसे आणि सभ्य, अंगभर वस्त्र, पोशाख घालूनच दर्शनासाठी येण्याचे आवाहन केले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मंदिराचे पावित्र्य आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे मंदिर प्रशासनाने सांगितले आहे.
या निर्णयाची अंमलबजावणी लवकरच होणार आहे. सध्या याबाबत भाविकांमध्ये जनजागृती करण्यासाठी फलक लावण्यात आले आहेत. या नियमानुसार, दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना तोकडे, स्लीव्हलेस किंवा अंगप्रदर्शन करणारे कपडे घालण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. यामुळे याबाबत पर्यटकांना माहिती असणे आवश्यक आहे.

हा नियम सक्तीचा नसून, मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी केलेली एक विनंती असल्याचे मंदिर व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गणपतीपुणे मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यासंदर्भात नियमावली तयार केली जात होती. अनेकदा याठिकाणी पर्यटक वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालतात. यामुळे याबाबत विनंती केली आहे.

आता एक फलक लाऊन त्यासंदर्भात जनजागृती करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील इतर अनेक मोठ्या मंदिरांमध्येही अशाच प्रकारचे नियम लागू करण्यात आले आहेत. यामुळे याठिकाणी येणाऱ्या काळात काय निर्णय सक्तीचा होणार हे लवकरच समजेल. यावर पर्यटक काय भूमिका घेणार हे देखील महत्वाचे आहे.