उरुळी कांचन येथील डॉ. अस्मिता प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाला जिल्हा स्तरीय क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद..


उरुळी कांचन : क्रीडा व युवक संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद पुणे व नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकीशाळा यांच्या संयुक्तिक विद्यमाने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा (१७ वर्षाखालील ) क्रिकेट प्रकारात उरुळी कांचन येथील डॉ. अस्मिता प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थ्यांनी डॉन बास्को स्कूल, पुणे यांचा पराभव करून विजेतेपद फटकाविले.

या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे जिल्ह्यातून कौतुक व अभिनंदन होत आहे. तसेच शनिवार (ता.२६) रोजी फुलगाव येथे झालेल्या १९ वर्षा खालील मुलांच्या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत डॉ अस्मिता ज्युनिअर कॉलेजने तृतीय क्रमांक पटकावला.

तर, १९ ते २० ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर येथे ३ री महाराष्ट्र राज्यस्तरीय सांबो अजिंक्य पद स्पर्धा २०२३ संपन्न झाली. यामध्ये विद्यालयाच्या विद्यार्थिनी अंजली नितीन गोते हिने स्पोर्टस सांबो सुवर्णपदक पटकाविले.

तसेच (ता.२३) रोजी लोणीकंद येथे झालेल्या तालुकास्तरीय स्पर्धेत डॉ अस्मिता विद्यालयाच्या १७ वर्षाखालील बुद्धिबळ स्पर्धेत ब्राझ पदक मिळविले. अल्पअवधीतच विद्यार्थ्यांने वेगवेगळ्या क्रीडा प्रकारत नेत्रदीपक प्रगती करून शाळेच्या व संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

या यशाबद्दल विद्यार्थिनीचे सर्वच स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे. या विद्यार्थ्यांना शंकर भाऊ वायकरसर , तानाजी गुलदगड सर, उप प्राचार्य चव्हाण मॅडम, आचार्य रोहिणी जगताप मॅडम, सर्व स्टाप यांचे मार्गदर्शन लाभले.

संस्थेचे अध्यक्ष महादेव कांचन, सचिव डॉ अजिंक्य कांचन सहसंचालिका, ऋतुजा कांचन, कार्यकारी संचालक डॉ. आप्पासाहेब जगदाळे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!