काळजी करू नका! काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी हेल्पलाईन क्रमांक प्रसिद्ध, थेट संपर्क साधा..

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या पहलगामल येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत आता जम्मू काश्मीरमध्ये अलर्ट जारी केला असून याबाबत कसून तपास सुरू आहे.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या मदतीसाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष सक्रिय झाला आहे. या घटनेमुळे अनेक पर्यटक आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये भीतीचं वातावरण असून, सरकारकडून मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत.
महाराष्ट्रातील पर्यटक आणि त्यांचे नातेवाईक यांच्या मदतीसाठी मंत्रालयातील महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या 022-22027990 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन, करण्यात आले आहे.
हा नंबर 24×7 कार्यरत असून, काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांबद्दल माहिती, संपर्क व मदतीसाठी वापरता येईल. श्रीनगरहून मृतदेह मुंबईला आणण्याची तयारीही सुरू असून, सरकारतर्फे सर्वतोपरी मदत करण्यात येत आहे.
श्रीनगर जिल्हाधिकारी कार्यालय – नियंत्रण कक्ष
0194-2483651 / 0194-2463651 / 0194-2457543
WhatsApp: 7006058623 / 7780805144 / 7780938397
Helpline Numbers l जिल्हानिहाय हेल्पलाईन क्रमांक :
धाराशिव जिल्हा – 02472-227301 / 225618
मोबाईल: 9665031744
Email: rdelosmanabad@gmail.com
अमरावती जिल्हा – जिल्हा नियंत्रण कक्ष: 0721-2662025
अनिल भटकर (निवासी जिल्हाधिकारी): 9421747777
सुरेंद्र रामेकर (आपत्ती व्यवस्थापन अधिकारी): 9545463450
पुणे जिल्हा – 020-26123371
9370960061