Diwali 2023 : गृहिणींना मोठा दिलासा, दिवाळीत खाद्यतेल स्वस्त, जाणून घ्या काय आहे दर..


Diwali 2023 : ऐन दिवाळीच्या सुरवातीला गृहिणींसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. तर शेंगदाणा तेलाचे दर टिकून आहेत. परदेशातून सूर्यफूल, पाम, सोयाबीन तेलाची आवक नियमित सुरू आहे.

खाद्यतेलाची आयात वाढलेली आहे. इस्रायलमधील युद्धजन्य परिस्थिती, तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खाद्यतेलाला मागणी कमी झाल्याने गेल्या काही महिन्यांपासून खाद्य तेलाच्या दरात टप्प्याटप्प्याने घट झाली. Diwali 2023

दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून गृहिणी बाजारपेठेतून तयार फराळाचे पदार्थ खरेदी करतात. कामाच्या व्याप सांभाळून फराळाचे पदार्थ तयार करणे गृहिणींना शक्य होत नाही.

त्यामुळे तयार फराळाचे पदार्थ खरेदी करण्याकडे कल वाढला असून, दिवाळीत मिठाई विक्रेते, फराळ तयार करणाऱ्यांकडून खाद्यतेलांना मागणी वाढते. तर, घरगुती ग्राहकांकडून खाद्यतेलांना असलेल्या मागणीत घट होत चालली आहे.

गेल्या वर्षी दिवाळीतील खाद्यतेलाचे दर विचारात घेता यंदा खाद्यतेलांच्या दरात ३० ते ३५ टक्क्यांनी घट झाली आहे. स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात नुकतीच १०० रुपयांनी वाढ झाली आहे. खाद्यतेलेवगळता बहुतांश अन्नधान्याचे दर तेजीत आहेत. खाद्यतेलाच्या दरात घट झाल्याने दिवाळीत गृहिणींना दिलासा मिळाला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!