वरंधा घाट रस्ता बंद करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे, दि. ६: राष्ट्रीय महामार्ग 965 डीडी राजेवाडी ते वरंधा, भोर-महाड या मार्गावरील वरंधा घाट परिसरातील रस्त्यावर पावसाळयात अतिवृष्टीमुळे संभाव्य दरडी कोसळून होणा-या दूर्घटना टाळण्याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून ३१ ऑगस्ट पर्यंत घाटरस्ता बंद करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी निर्गमित केले आहे.

पुण्याकडे जाण्यासाठी माणगाव-निजामपुर-ताम्हिणी घाट-मुळशी-पिरंगुट-पुणे तसेच कोल्हापूरकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा-पोलादपूर-महाबळेश्वर-वाई-सुरुर-सातारा-कराड-कोल्हापूर किेवा राजेवाडी पाटा-पोलादपुर-खेड-चिपळून पाटण-कराड-कोल्हापूर या पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्याबाबतचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
Views:
[jp_post_view]