भाजपच्या अध्यक्षपदासाठी महाराष्ट्रातून ‘या ‘नेत्यांच्या नावाची चर्चा ; कोणाला मिळणार संधी?

पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे.पितृपक्षानंतर भाजपला नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळण्याची शक्यता असून, नवरात्रीच्या सुमारास घोषणा होण्याची शक्यता आहे. यासाठी महाराष्ट्रातुन जे. पी. नड्डा यांच्यासह दिनेश शर्मा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावांची अध्यक्षपदासाठी चर्चा आहे. आता भाजपचा अध्यक्षपदासाठी कोणाला संधी मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

भाजप आणि संघाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही नाव चर्चेत आहे. विधानसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर फडणवीस यांचं नाव अध्यक्ष पदाच्या शर्यतीत आहे. त्याचबरोबर संभाव्य ब्राह्मण चेहऱ्यांमध्ये विद्यमान अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं नाव आघाडीवर आहे. ब्राह्मण नेत्याकडे अध्यक्षपद जावं अशी संघाची इच्छा आहे. त्यामुळे नड्डा अध्यक्ष पदावर कायम राहणार असल्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.तसेच अध्यक्ष पदासाठी चर्चेत असलेल्या ब्राह्मण चेहऱ्यांमध्ये राज्यसभेचे खासदार दिनेश शर्मा यांच्याही नावाचा समावेश आहे.
दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं समीकरण बांधण्यासाठी आणि पक्षात पुढच्या पिढीचं नेतृत्व तयार करण्यासाठी फडणवीस यांना संधी दिली जाऊ शकते. फडणवीस यांच्याकडे पक्षाचं अध्यक्षपद सोपवलं गेल्यास पक्षाचे महासचिव आणि बिहारचे प्रभारी यांच्याकडे राज्याची धुरा सोपवली जाऊ शकते. त्यामुळे भाजपच्या अध्यक्षपदाची धुरा कोणाकडे येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
