दिशा कृषि उन्नतीची! आता निर्यातक्षम पिकांचे क्षेत्र व उत्पादन वाढणार, राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय…


पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झुंबर हॉल, विधानभवन, पुणे येथे दिशा कृषि उन्नतीची २०२९ व कृषि समृद्धी योजना या विषयाची सभा आयोजीत करण्यात आली होती. पुणे जिल्ह्यात दिशा कृषि उन्नतीची @२०२९ हा पंचवार्षीक कृषि विकास आराखडा तयार करण्यात आलेला आहे.

या संदर्भात पुढील पाच वर्षात करण्यात येणाऱ्या तरतुदींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच कृषी समृद्धी योजनेबाबतचाही तपशील सादर करण्यात आला. जिल्ह्यातील निर्यातक्षम पिकांचे क्षेत्र व उत्पादन वाढ, पायाभूत सुविधा निर्माती, सूक्ष्म सिंचनाखालील क्षेत्रात वाढ करणे, फळपिकांखालील क्षेत्रात वाढ करणे, हा आहे.

तसेच यांत्रीकीकरणास चालना देणे, कृषि प्रक्रिया वाढ एआय व आयओटी सारख्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर या शासनाच्या पुढील पाच वर्षाच्या कालखंडातील उदिष्टांवर भर देण्याचे निश्चित करण्यात आले. यावेळी शेतीसंबंधी अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.

       

याप्रसंगी राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, दिलीप वळसे पाटील, शिवाजीराव आढळराव पाटील, अमोल कोल्हे, आमदार माऊली आबा कटके, आमदार शरद सोनवणे, अतुल बेनके, कृषी विभाग व जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!