उरुळी कांचनमध्ये पार्क केलेल्या गाडीतुन डिझेल चोरी; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल


पुणे : गेल्या काही दिवसापासून पुण्यात गुन्हेगारी घटनांचे प्रमाण वाढले असताना मौजे उरुळी कांचनच्या हद्दीत शिवनेरी मिसळ समोर अशोक लेलँड कंपनीची गाडी पार्क केलेली असताना शनिवारी (ता. 23) डिझेलची चोरी झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी उरळी कांचन पोलीस स्टेशनमध्ये अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गाडीतून डिझेल चोरी झाली असल्याची फिर्याद अमोल हनुमंतराव निगडे (वय 42 वर्ष व्यवसाय ड्रायव्हर रा मु. पो. गुलूचे कर्नल वाडी ) यांनी उरुळी कांचन पोलीस स्टेशनमध्ये दिली. दिलेल्या फिर्यादीनुसार शनिवारी पहाटेच्या सुमारास शिवनेरी मिसळ समोर अशोक लेलँड कंपनीची गाडी पार्क केली होती. त्यातील कोणीतरी अज्ञात चोरट्याने गाडीतील डिझेल चोरी करून चोरून नेले आहे. चोरट्याने एकूण 18 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!