धनंजय मुंडे यांचा राजीनामा नैतिकतेच्या आधारावर नाही, मुंडे म्हणाले, वैद्यकीय कारणास्तव मी राजीनामा दिला, राज्यात पुन्हा संताप…

मुंबई : जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या करण्यात आली. यानंतर आज मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. या हत्येचे खळबळजनक फोटो काल व्हायरल झाले. यामुळे महाराष्ट्र हादरला आहे. यामुळे राज्यातील वातावरण तापले आहे.
याबाबत आज धनंजय मुंडे राजीनामा दिल्यानंतर म्हणाले, हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे.
तसेच न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मा. मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे, असं ट्विट त्यांनी केले आहे.
दरम्यान, धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड हाच संतोष देशमुख यांच्या हत्येचा सूत्रधार असल्याचे समोर आले. यानंतर आता मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे विरोधकांनी या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हाच सूत्रधार असल्याचे पोलिसांनी आरोपपत्रात म्हटले आहे.
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची क्रौर्याची परिसिमा गाठणारे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आरोपी महेश केदारच्या फोनमधून जवळपास 15 व्हिडीओ आणि 8 फोटो जप्त करण्यात आलेत. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे.