धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं, आता सहा महिन्यात आमदारकीही जाणार, आता नवीन प्रकरण आलं समोर..

मुंबई : संतोष देशमुख हत्या प्रकरणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी शपथपत्रात करुणा शर्मा यांच्या मिळकतीबाबत उल्लेख केला नव्हता. त्यामुळे करुणा शर्मा यांनी ऑनलाइन तक्रार केली होती. याबाबत आता मोठा खुलासा झाला आहे.
करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीवर आज परळी न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणी आधीच करुणा शर्मा यांनी मोठा दावा केला आहे. सहा महिन्यात धनंजय मुंडेंची आमदारकी जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. यामुळे आता नेमकं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढ झाली आहे.
धनंजय मुंडेंनी 200 बूथ कॅप्चर केले आहे. तसे निवडणुकीत माझे नाव टाकले नाही, आमच्या केसचा संदर्भ दिला नाही. 2014 पासून माझे नाव आणि माझ्या मुलाबाळांचे नाव टाकले नाही. यावर निवडणूक अधिकारी, कलेक्टर कोणीच ऑब्जेक्शन घेतले नाही. तसेच
2024 मध्ये माझ्या मुलांचे नाव टाकले आणि माझे नाव गायब केले, असे करुणा मुंडे यांनी म्हटले आहे.
या सर्वावर माझी लढाई सुरू आहे. आता त्यांचे वॉरंट निघेल, त्यांना सहा महिन्यांची शिक्षा होईल. आज स्वतः धनजय मुंडे यांना जावे लागणार आहे. जसे मी बोलले होते की, मंत्रीपद जाणार तर ते गेले. आता मी सांगते की, आमदारकीही जाणार आहे. सहा महिन्यात त्यांची आमदारकी जाईल, असा दावा त्यांनी केला आहे, यामुळे असे झाले तर तो धनंजय मुंडे यांच्यासाठी मोठा धक्का असेल.
दरम्यान, लोकांच्या पैशांचा गैरवापर आणि लोकांचे पैसे जाणे, हे आहे. पण, भ्रष्ट लोकांना मंत्रालयात बसविले तर काय न्याय मिळणार? त्यामुळं हे गेले पाहिजे. यामुळे येणाऱ्या काळात राज्याच्या राजकारणात अनेक धक्कादायक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे.