Devendra Fadnavis : यशवंत कारखान्यासाठी लवकरच धोरणात्मक निर्णय घेणार! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शिष्टमंडळाला अश्वासन..!!


Devendra Fadnavis : उरुळीकांचन : थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भात लवकरात लवकर मी स्वतः हा आणि उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करुन धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचे अश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टमंडळाला दिले आहे.

यशवंत कारखान्याची अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक होताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्याच दिवशी कारखान्याच्या नवनियुक्त अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच पॅनेल प्रमुख यांना भेटीला वेळ देत यशवंत कारखान्याचा संपूर्ण प्रश्नाची माहिती घेतली.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांना शिष्टमंडळाने कारखान्यावरील कर्ज ओटीएस करण्यासहीत केंद्रातून एन सीडीसी कर्जाचे पॅकेज कारखाना सुरू करण्यासाठी आवश्यक असल्याची मागणी फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. Devendra Fadnavis

यावर फडणवीस यांनी कारखान्याचा ऑडीट व अर्थिक ताळेबंद सादर करण्याची सूचना शिष्टमंडळाला करताना, कारखाना सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व पूर्तता करुन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा करुन कारखाना प्रश्नात मदत करण्याचे अश्वासन संचालक मंडळाला दिले आहे.

या भेटीत दौंड आमदार राहुल कुल, जिल्हा बँकेचे संचालक प्रदिप कंद, बाजार समितीचे संचालक प्रकाश जगताप, प्रशांत काळभोर, कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप, उपाध्यक्ष मोरेश्वर काळे आदी उपस्थित होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!