Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द पाळला!! कोपर्डी घटनेतील पीडितेच्या बहिणीच्या लग्नाला लावली हजेरी…

Devendra Fadnavis : कोपर्डीत ८ वर्षांपूर्वी एक दुर्दैवी घटना घडली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून पीडित कुटुंबीयांशी संवाद साधला होता. कुटुंबीयांनी पीडितेच्या बहिणीच्या लग्नाबद्दल चिंता व्यक्त केली.
तेव्हाच तिच्या लग्नाची जबाबदारी मी घेतो आणि त्या लग्नालाही मी आवर्जून येईन, असा शब्द देवेंद्र फडणवीसांनी दिला होता. त्यामुळे दिलेला शब्द पाळत देवेंद्र फडणवीस आवर्जुन लग्नाला उपस्थित राहिले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, विवाहाचं निमंत्रण होते, त्यामुळे कोपर्डीत आलो. वधू -वराला शुभेच्छा दिल्या. आज दोन कुटुंब एकत्र येत आहेत. सर्वजण वधू -वराला आर्शीवाद देण्यासाठी या विवाह सोहळ्याला आले आहेत. मी वधू वराला शुभेच्छा देतो आहे. Devendra Fadnavis
कोपर्डी प्रकरण काय आहे?
अहिल्यानगर जिल्ह्यातल्या कोपर्डी येथे जुलै २०१६ च्या सायंकाळी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत आंदोलन पेटलं होते.
या प्रकरणातील तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी मराठा समाजाने राज्यभर आंदोलन केले होते. या आंदोलनाला सर्व स्तरातून पाठिंबा मिळाला होता. तर दोषी असलेल्या तिघांना फाशी दिली तरच आमच्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळेल, अशी मागणी पीडितेच्या कुटुंबानं केली होती.
अखेर त्या तीनही आरोपींना अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. दरम्यान, महाराष्ट्राला हादरून सोडणाऱ्या या घटनेला आता आठ वर्ष पूर्ण झाली आहेत.