बीड पोलिसांच्या वर्दीवर आता फक्त स्वतःचं नाव, नवीन पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांचा निर्णय, विचार करायला लावणारे कारणही आलं समोर..

बीड : गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्हा सतत वेगवेगळ्या गुन्हेगारीच्या कारणाने चर्चेत येत आहे. येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर याठिकाणी मोठा गोंधळ बघायला मिळत आहे. यामुळे पोलिसांच्या कामावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. याठिकाणी आता सामाजिक सलोखा राखण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्ह्यात आता पोलिसांच्या वर्दीवर आता फक्त स्वतःच्या नावाचा उल्लेख असल्याचे पाहायला मिळणार आहे. सामाजिक सलोखा राखण्यासाठी बीडचे नवीन पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचे पाहायला मिळत आहे.
त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून साामाजिक सलोखा देखील बिघडू लागला असल्याने पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्याकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. बीड पोलिसांच्या वर्दीवर आता फक्त स्वतःच्या नावाचा उल्लेख असणार असून वर्दीवरील नेमप्लेटवर आता आडनावाचा उल्लेख नसणार आहे. यामुळे याचा काही फरक पडणार का? हे लवकरच समजेल.
बीडमध्ये पोलिस अधीक्षकांपासून कॉन्स्टेबलपर्यंत सर्वांच्याच टेबलांवरील आणि छातीवरील नेमप्लेटमधून आडनाव हटवले जाणार आहे. दरम्यान, नवनीत कॉवत यांनी पोलिसांनी एकमेकांना आडनावाने नाहीतर केवळ नावानेच हाक मारावी, असे सांगितले होते. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
त्यांनी पोलिसांच्या नेमप्लेटवरील आडनावंही हटवली होती. यानंतर आता बीड पोलिसांच्या नेमप्लेटसह टेबलावरही फक्त त्यांची नावे आणि पदं नमूद करण्यात आली आहेत. यामुळे बीड पोलिसांचे कौतुक होत आहे. मात्र याचा फरक किती पडणार यावर सगळं गणित अवलंबून आहे.