Daund News : पती-पत्नीला मारहाण करून ३ लाखांचा ऐवज लुटला, दौंड तालुक्यात दरोड्याचा धक्कादायक थरार..


Daund News : चोरट्यांनी घर फोडून पती पत्नीला मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी देत २ लाख ८४ हजार रूपयांचा ऐवज जबरदस्तीने लुटून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी (ता.२४) मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास दौंड तालुक्यातील लिंगाळी हद्दीतील लोंढे मळा याठिकाणी घडली आहे. Daund News

मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश वत्रे यांचे वडील शिवाजी वत्रे आजारी असून त्यांच्या उपचारासाठी आई, बहीण यांना सोबत घेऊन तिघांना आळंदी येथील इंद्रायणी हॉस्पिटलमध्ये सोडले होते. त्यानंतर फिर्यादी लिंगाळीमधील घरी आले होते.

रात्री जेवण करून अविनाश त्यांची पत्नी कोयल, मुलगा रियांश हे सर्वजण घरात झोपले होते. रात्री दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाज्यावर लाथ मारून दरवाजा तोडला. घरात प्रवेश केला.

यादरम्यान पती पत्नीला मारहाण करीत दम देत शांत बसण्यास सांगितले. कपाट उघडून कपडे अस्ताव्यस्त फेकून सोन्याचे मंगळसूत्र, मुलगा रियांश याचे कानातील डुल, रोख रक्कम जबरीने काढून घेतले.

अविनाश त्यांचा मुलगा व पत्नी या तिघांना अंगावर पांघरुन घेऊन झोपण्यास सांगितले. चोरटे घरातील इतर खोल्यात चोरी करण्यासाठी गेले. पांघरुन काढून पाहिल्यावर चोरटयांनी पुन्हा दांडक्याने मारहाण केली.

अविनाश म्हणाला, ‘आम्हाला मारु नका तुम्हाला जे पाहीजे ते सर्व देतो. पुन्हा चोरट्यांनी घरातील बेडरुमचे दरवाजे तोडून इतर ठिकाणी शोधाशोध सुरू केली.’ तिघे झोपलेल्या बेडरुमचा दरवाजाला कडी लावून चोरटे फरार झाले.

हा प्रकार वत्रे यांनी फोनवरून आजूबाजूला राहणाऱ्यांना सांगितला तसेच घराकडे येण्याची विनंती केली. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच काही वेळात दौंडचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान, या घटनास्थळी बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव, पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!