लाडक्या बहिणीचा जानेवारीचा हफ्ता मिळण्याची तारीख ठरली, ‘या’ दिवशी १५०० रुपये खात्यावर होणार जमा, जाणून घ्या..


मुंबई : ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे. अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात.

गेल्या वर्षी जुलै महिन्यात ही योजना सुरू करण्यात आली होती. डिसेंबरपर्यंतचे हाप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. आता सर्वांचं लक्ष लागलं आहे ते म्हणजे जानेवारीचा हाप्ता कधी मिळणार त्याकडे..

अशातच आता जानेवारी महिन्याचा हफ्ता मिळण्याची तारीख समोर आली आहे. लाडक्या बहिणींना २६ जानेवारीच्या आधीच या महिन्याचा हफ्ता मिळणार असल्याचं राज्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर केले आहे.

या संबंधी माहिती देताना आदिती तटकरे म्हणाल्या की, २६ जानेवारीच्या आधी जानेवारी महिन्याचा लाभ मिळेल असा प्रयत्न सुरू आहे. यासाठी ३,६९० कोटींचा निधी आम्हाला मिळणार आहे.

अर्थसंकल्पाच्यावेळी देखील महिलांना लाभ कसा मिळेल याची तरतूद आम्ही करणार आहोत. त्या तीन ते चार दिवसांमध्ये पैसे बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल. ही योजना सुरूच राहणार आहे, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!